गेल्या वर्षीच्या तुलनेत वाशी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली, काय आहेत दर
गेल्या वर्षीच्या तुलनेत वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. 40 ते 45 हजार आंब्याच्या पेट्यांची वाशी मार्केटमध्ये आवक झाली आहे. तसेच रमजान सुरु झाल्यामुळे अखाती देशात हापूस भाव खात आहे. युरोपलाही हापूस आंब्यांनी भुरळ घातली आहे.
पुणे, रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी अन् देवगड हापूस देशात नाही तर विदेशातही प्रसिद्ध आहे. यामुळे युरोपातील बाजारातही त्याला चांगला भाव मिळत आहे. भारतीय चाहत्यांबरोबर विदेशातील खवय्यांच्या पसंतीला हापूस उतरत आहे. कोकणातील 40 टक्के आंबा युरोप आणि आखाती देशांमध्ये निर्यात होतो. आता रमजान महिना सुरू झाल्यामुळे आखाती देशात हापूसच्या मागणीत आणखी वाढत आहे. दुसरीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. 40 ते 45 हजार आंब्याच्या पेट्यांची वाशी मार्केटमध्ये आवक झाली आहे. यामुळे आता दर आवाक्यात आले आहे.
वाशीमध्ये दर किती
वाशीच्या बाजारात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा आला आहे. यामुळे मार्चच्या सुरवातीला वाढलेले दर आता घसरु लागले आहे. आब्यांच्या साईज व क्वॉलेटीनुसार दर आहे. आता हापूस आंब्याला पंधराशे ते साडेचार हजार दर मिळत आहे. गेल्याच वर्षी वाशी मार्केटमध्ये वीस ते पंचवीस हजार आंब्याच्या पेट्यांची आवक झाली होती. त्यावेळी दर दोन ते पाच हजारापर्यंत होता. दर आवाक्यात आल्यानंतर अनेक मुंबईकरांनी वाशी मार्केटमध्ये हजेरी लावली आहे. यामुळे हापूस खरेदीसाठी गर्दी झाली आहे.
आवक चांगली
गेल्या आठवडाभरात कोकण पट्ट्यात झालेल्या पावसामुळे मार्केट यार्डात हापूस आंब्याची आवक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे मार्केट यार्डात हापूस आंब्याच्या साठ्याची चांगली आवक होत आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याचे दर फळांच्या आकारानुसार चार ते सहा डझन पेट्यांसाठी ठरवले जात आहेत. परंतु हे दर सरासरी एक हजार रुपये डझनवर जात आहे.
कोकणातून कुठे निर्यात
कोकणातून सौदी अरेबिया, नेदरलँड, युरोपीय देश, अरब देश, कुवेत, अमेरिका, जर्मनी व चीनमध्ये हापूस आब्यांला खूप मागणी आहे. तसेच आब्यांबरोबर कोकणातून 10 हजार मेट्रिक टन पल्पची निर्यात होते. त्यातून 90 कोटी 39 लाख परकीय चलन अपेक्षित आहे. आंबा आमि पल्प निर्यातून सुमारे 340 कोटी रुपये परकीय चलन मिळते. समुद्रमार्गे आब्यांची निर्यात होणार असेल तर त्याचा थेट फायदा स्थानिक शेतकर्यांना होणार आहे. त्याद्दष्टिने हालचाली करणे गरजेचे आहे.
गुढी पाडव्यासाठी आंबे खरेदीला जाताय, आधी दर पाहून जा…वाचा सविस्तर