AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : फडणवीसांना उपममुख्यमंत्री करून भाजपनं अपमानित केलंय, दिग्विजय सिंह यांनी पुन्हा डिवचलं

आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडून फडणवीसांची खिल्ली उडवणं सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावरून तुफान बॅटिंग केली. तर आज काँग्रेसने नेते दिग्विजयसिंह यांनी पुण्यातून पडणवीसांवर याच मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

Devendra Fadnavis : फडणवीसांना उपममुख्यमंत्री करून भाजपनं अपमानित केलंय, दिग्विजय सिंह यांनी पुन्हा डिवचलं
फडणवीसांना उपममुख्यमंत्री करून भाजपनं अपमानित केलंय, दिग्विजय सिंह यांनी पुन्हा डिवचलंImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 10, 2022 | 8:05 PM
Share

पुणे : संपूर्ण देशाचं लक्ष ज्या सत्तांतराकडे लागलं होतं. ते सत्तांतर अखेर राज्यात घडून आलं. त्यानंतर सर्वांना वाटत होतं आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच भाजपकडून मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. पण झालं उलट पत्रकार परिषदेत खुद्द फण्णविसांनीच मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विराजमान होतील आणि एकच शपथविधी होईल. मी या कॅबिनेटमध्ये (Maharashtra Cabinet) नसेल, अशा मोठ्या सर्वांना सरप्राईज करणाऱ्या घोषणा करून टाकल्या. त्यानंतर अर्ध्याच तासात चक्र अशी काही फिरली की उपमुख्यमंत्रीपदी फडवीसांना शपथ घ्यावी लागली. फडणवीसांची इच्छा जरी नसली तरी थेट केंद्रीय नेतृत्वाकडून आदेश आल्यामुळे फडणवीसांना त्याच दिवशी शपथ घेणं भाग पडलं. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडून फडणवीसांची खिल्ली उडवणं सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावरून तुफान बॅटिंग केली. तर आज काँग्रेसने नेते दिग्विजयसिंह यांनी पुण्यातून पडणवीसांवर याच मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

काय म्हणाले तेही ऐका

दिग्विजय सिंह नेमकं कय म्हणाले?

याबाबत बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले, मला असं वाटतं की मी त्या जागी असतो तर मी त्या निर्णयाचा स्वीकार केला नसता. तसेच मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांना जाणूनबुजून भाजपने अपमानित केलं आहे. हे त्यांच्या चेहऱ्यावरूनही दिसतंय. असा टोला दिग्विजयसिंह यांनी पुण्यात फडणवीसांना आणि भाजपला लगावला आहे. जेव्हापासून फडणीवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून रोज यावर प्रतिक्रिया उमटत आहेत, आता सिंग यांनीही त्यांना याचवरून पुन्हा डिवचलं आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही खिल्ली

देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी बसावं लागणं आणि एकनाथ शिंदे मंत्री होणं राज्यातील जनतेसाठीही आश्चर्याचा धक्का होता असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, तसेच महाविकास आघाडीतील अनेक नेते म्हणाले आहेत. तर भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावरची नाराजीही उघड दिसते असे, म्हणत महाविकास आघाडीने भाजप नेत्यांचीही खिल्ली उडवली आहे. याच वरून बोलताना अजित पवार यांनी अधिवेशनात गिरीश महाजन यांनाही जोरदार टोलेबाजी केली आहे. गिरीश महाजन हे अजूनही रडत आहेत. त्यांना तर काय कळेना, काय झालंय, असे म्हणत अजित पवारांनी यावरून डिवचलं होतं. तर त्यांचे जास्त आमदार असूनही मला मुख्यमंत्री केलं हे फडणवीस आणि भाजप नेत्यांचं मोठेपण आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक करण्यात आलं होतं. मात्र आता दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा यावर भाजपकडूनही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.