Pune crime : पैसे देऊन मिळतंय दिव्यांग प्रमाणपत्र! पुण्यातल्या ससून रुग्णालयात होतोय काळाबाजार
ससून रुग्णालय (Sasoon Hospital) याठिकाणी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देत असल्याचे रॅकेट उघड झाले आहे. खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देणारे रॅकेट शोधण्यासाठी ससून रुग्णालयाने आता त्रिसदस्य चौकशी (Enquiry) समिती नेमली आहे.
पुणे : ससून रुग्णालय (Sasoon Hospital) याठिकाणी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देत असल्याचे रॅकेट उघड झाले आहे. खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देणारे रॅकेट शोधण्यासाठी ससून रुग्णालयाने आता त्रिसदस्य चौकशी (Enquiry) समिती नेमली आहे. पैसे देऊन खोटे दिव्यांग प्रमाणपत्र (Certificate) देण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर ही समिती नेमण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून अशाप्रकारचा काळाबाजार होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता चौकशी समिती नेमण्यात आली आहे. आतापर्यंत किती जणांना अशाप्रकारचे खोटे प्रमाणपत्र देण्यात आले आहे, रुग्णालयातील किती जणांचा यात सहभाग आहे, याची पडताळणी ही चौकशी समिती करणार आहे. ज्यांना हे खोटे प्रमाणपत्र देण्यात आले आहे, त्यांनी कोणकोणत्या योजनांचा लाभ घेतला, याचाही तपास ही चौकशी समिती करणार आहे.
ससून आणि वाद
रुबी हॉल क्लिनिकमध्ये झालेल्या किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी नुकतीच ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना निलंबित करण्यात आले होते. तावरे हे विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते. तर एका महिलेने पोलिसांत तक्रार केल्यावर वैद्यकीय विभागाने रुबी हॉल क्लिनिक आणि ससूनच्या सर्वोपचार अधीक्षकांवर कारवाई केली आहे. डॉ. तावरे हे ससून रुग्णालयाचे अधीक्षक आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते.