पुणे – ऐन दिवाळीत वेतन न मिळाल्याने वीज वितरण कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने आज पुण्यात प्रशासन आणि ऊर्जा मंत्रालयाचा जाहीर निषेध नोंदवला . यावेळी महावितरण महापारेषण महानिर्मिती(Mahavitaran Mahapareshan Mahanirmiti) या तिन्ही वीज कंपनीतील हजारो कंत्राटी कामगारांना रस्त्यावर उतरले होते.
कोरोना काळात या कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून राज्यातील जनतेला अखंडित व सुरळीत वीज सेवा देण्यात मोठे योगदान दिले. आतापर्यंत 55 कामगार शहीद झाले आहेत. वीज बिल वसुलीसाठी प्रसंगी वीज ग्राहक नागरिकांच्या शिव्या, मार खाऊन वीज बिल वसुली देखील जोमाने केल्याची भावना कामगारांनी व्यक्त केल्या.
दिवाळीत सणाच्या पार्श्वभूमीवर या कष्टकरी कंत्राटी कामगारांचे वेतन व बोनस दिवाळी पूर्वी होणे गरजेचे आहे असे पत्र संघटनेने दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी राज्याचे प्रधान ऊर्जा सचिव व तिन्ही वीज कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले होते. मात्र दीड महिना अगोदर पत्र देऊन देखील प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत या कामगारांची दिवाळी काळी करण्याचा घाट घातला आहे , की काय अशी शंका व्यक्त होत आहे.
हजारो कंत्राटी कामगार रिक्त पदांवर तुटपुंज्या वेतनावर वर्षानुवर्षे कष्ट करत आहेत. विक्रमी वीज बिलाचा महसूल गोळा करून वीज कंत्राटी कामगारांना मात्र आज स्वतःच्या वेतनासाठी कंत्राटदारांना विनवण्या कराव्या लागत आहेत. कंपनीच्या संचालक मंडळ ते शिपाई पदाच्या कामगारांची दिवाळी गोड करणाऱ्या वीज कंत्राटी कामगारांना हक्काच्या वेतानासाठी अक्षरशः भिक मागण्याची वेळ आली आहे. शासन, उर्जामंत्रालय आणि वीज कंपनी व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे कामगारांचे विदारक चित्र राज्यभर दिसत आहे.
इतर बातम्या :
एसटी कामगारांना नोकरीवरून काढू नका, नाही तर…; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्रं
लखलखत्या सोन्याचा कस, कसोटी ते कॅरोटोमीटर, सोने परीक्षणाच्या पद्धती सांगणारा Special Report!
बनावट प्रमाणपत्रे दावून वानखेडेंनी नोकरी बळकावली, भीम आर्मीची जात पडताळणी समितीकडे तक्रार