Ganeshotsav 2022 : चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबग; एसटी, रेल्वे फूल्ल, ट्रॅव्हल्स व्यवसायिकांकडून प्रवाशांची लूट

बाप्पाचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. चाकरमाने गणपतीसाठी विविध शहरांमधून आपल्या घरी दाखल होत आहेत. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्यात दुप्पट वाढ झाली आहे.

Ganeshotsav 2022 : चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबग; एसटी, रेल्वे फूल्ल, ट्रॅव्हल्स व्यवसायिकांकडून प्रवाशांची लूट
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 9:33 AM

पुणे : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganeshotsav) लगबग दिसून येत आहे. बाप्पाचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. चाकरमाने गणपतीसाठी विविध शहरांमधून आपल्या घरी दाखल होत आहेत. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने रेल्वे (Railway) तसेच जवळपास सर्वच एसटी बस फूल्ल झाल्या आहेत. याचाच फायदा आता खासगी ट्रॅव्हल्स (Travels) व्यवसायिक उठवताना दिसत आहेत. एसटी आणि रेल्वे फूल्ल झाल्याने चाकरमान्यांनी गावी जाण्यासाठी आता आपला मोर्चा ट्रॅव्हल्सकडे वळवला आहे. या संधीचा फायदा घेत ट्रॅव्हल्स व्यवसायिकांनी भाड्याच्या दरात दुप्पट वाढ केली आहे. पुणे-मुंबई प्रवास दुपटीने महागला आहे. पूर्वी पुण्याहून मुंबईला येण्यासाठी 400 ते 500 रुपयांचे भाडे आकारण्यात येत होते. मात्र आज भाड्यामध्ये वाढ होऊन ते 800 ते 1000 रुपयांवर पोहोचले आहे. मात्र गावी जाण्यासाठी आता दुसरा पर्याय नसल्याने अनेक जण अतिरिक्त भाडे भरून प्रवास करत असल्याचे चित्र आहे.

संधीचा फायदा

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. मात्र गेले दोन वर्ष देशासह राज्यात कोरोना संकट असल्याने गणेशोत्सवावर निर्बंध आले होते. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प होती. त्यामुळे चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी आपल्या घरी जाता आले नाही. मात्र यंदा कोरोना संकट कमी झाल्याने निर्बंधमुक्त वातावरणात हा उत्सव साजरा होत आहे.  दोन वर्ष गावी जायला न मिळाल्याने यंदा चाकरमान्यांनी गावी जाण्यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे सर्व रेल्वे आणि एसटी बस फूल्ल झाल्या आहेत. दुसरा पर्यायच नसल्याने गावी जाणाऱ्यांनी आपला मोर्चा आता खासगी ट्रॅव्हल्सकडे वळवला आहे. याचाच फायदा घेऊन ट्रॅव्हल्स व्यवसायिकांनी आपल्या भाड्यात दुप्पट वाढ केली आहे. पुणे ते मुंबईदरम्यानेच पूर्वीचे भाडे 400 ते 500 रुपये एवढे होते. आज त्यात दुप्पट वाढ झाली आहे.

जादा बसची व्यवस्था

दरम्यान दुसरीकडे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या वतीने जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागामधून कोकण आणि नवी मुंबईत जाण्यासाठी 165 जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाकडून 330 चालक आणि 330 वाहकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.