Pune : पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, शेती सिंचनासाठीही धरणात मुबलक पाणीसाठा
शेतीला पाणी मिळावे हाच धरणे उभरण्यामागचा खरा उद्देश होता. पण काळाच्या ओघात पिण्याच्या पाण्याचीच भ्रांत निर्माण झाली. त्यामुळे आगोदर नागरिकांना पिण्यासाठी पाणी राखीव ठेवले जाते आणि नंतर शेतीचा विचार केला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षापासून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता तर मिटत आहे पण शेतीसाठीही पाणी राखीव ठेवले जात आहे.
पुणे : यंदा पावसाने अशी काय हजेरी लावली आहे की, ऑगस्टच्या मध्यावरच (Dam Water) राज्यातील धरणांमध्ये सरासरीच्या तुलनेत 77 टक्के पाणीसाठा झालेला आहे. ही राज्यातील स्थिती असली तरी (Pune City) पुणे शहरालगतचे खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणामध्ये 99.37 टक्के (Water Level) पाणीसाठा झालेला आहे. यामधील तीन धरणे ही 100 टक्के भरलेली आहेत तर टेमघर धरणात 95.6 टक्के पाणीसाठा आहे. पाण्याची आवक अशीच सुरु राहिली तर मात्र, हे धरण देखील अल्पावधीतच तुडूंब भरणार आहे. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले तरी मुख्य शहरांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.खडकवासला, वरसगाव,पानशेत आणि टेमघर धरणात सरासरीएवढा पाणीसाठा झाल्याने आता पुणेकरांची वर्षाच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे.
शेतीलाही मिळणार पाणी
शेतीला पाणी मिळावे हाच धरणे उभरण्यामागचा खरा उद्देश होता. पण काळाच्या ओघात पिण्याच्या पाण्याचीच भ्रांत निर्माण झाली. त्यामुळे आगोदर नागरिकांना पिण्यासाठी पाणी राखीव ठेवले जाते आणि नंतर शेतीचा विचार केला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षापासून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता तर मिटत आहे पण शेतीसाठीही पाणी राखीव ठेवले जात आहे. दोन वर्षापासून ही परस्थिती निर्माण होत आहे. गतवर्षी तरी परतीच्या पावसाने दिलासा दिला होता यंदा तर हंगाम मध्यावर असतानाच पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा विषय मिटला आहे.
चार धरणातून पुणेकरांना पाणी
पुणे शहाराला खडकवासला, वरसगाव,पानशेत आणि टेमघर या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. चार पैकी खडकवासला, वरसगाव, पानशेत ही तीनही धरणे 100 टक्के भरलेली आहेत तर टेमघर ही काही दिवसांध्ये ओव्हरफ्लो होईल, सध्या हे 95.6 टक्के एवढे भरलेले आहे. पाण्याची आवक अशीच राहिली तर आठ दिवसांमध्ये 100 टक्के भरले जाणार. हंगामाच्या मध्यावरच पावसाने दमदार हजेरी लवाल्याने ही चिंता मिटली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत 20 टक्के अधिकचा पाणीसाठा
राज्यात जुलै आणि या महिन्यात चांगला पाऊस पडलाय, त्यामुळे राज्यातील धरणे 77.66 टक्के भरली आहेत. सरासरीच्या तुलनेत कोकण विभागातील धरणामध्ये 89 टक्के पाणीसाठा तर पुणे विभागातील धरणांत 83 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. नागपूर विभागात धरणांमध्ये 71.47 टक्के पाणीसाठा आहे. राज्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने, पिण्याच्या पाण्याची आणि काही भागात शेतीच्या पाण्याचीही चिंता मिटली आहे.