Pune : दरड कोसळल्यामुळे बालेकिल्याचा मार्ग गेला ढिगाऱ्याखाली, पर्यटकांना जाण्यास बंदी

Rain News : राज्यात सर्वत्र पावसाचा जोरा कायम आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे दरड कोसळण्याचा घटना काही भागात घडत आहे.

Pune : दरड कोसळल्यामुळे बालेकिल्याचा मार्ग गेला ढिगाऱ्याखाली, पर्यटकांना जाण्यास बंदी
landslide
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 9:30 AM

विनय जगताप, वेल्हा, पुणे | 23 जुलै 2023 : पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवासांपासून हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. पुणे शहरात मुसळधार पाऊस नसला तरी घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. घाटमाथ्यावर सुरु असलेल्या पावसामुळे प्रशासनाने भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट रस्ता बंद केला आहे. हा घाट अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद केला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात दरड कोसळण्याची घटना घडली आहे.

राजगडाच्या बालेकिल्लावर जाण्यास बंदी

पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यास आता बंदी असणार आहे. या ठिकाणी कातर खडकातील पाय मार्गावर कड्याच्या मोठ्या दगडासह दरड कोसळली आहे. या घटनेनंतर प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली आहे. दरड कोसळली त्यावेळी सुदैवाने त्या ठिकाणी पर्यटक नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

महाकाय दगडासोबत दरड कोसळली

पहाटेच्या सुमारास बालेकिल्ल्याच्या उंच कड्याचा महाकाय दगडा बरोबर दरड कोसळली. त्यामुळे झाडे झुडपेही जमीनदोस्त झाली आहेत. दरडीच्या मोठ्या मलव्याखाली शंभर फूट अंतराचा बालेकिल्ल्याच्या मार्ग गाडून गेला होता. पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काही मलवा काढून मार्ग मोकळा केला. त्यानंतरही या ठिकाणी दरडीचा धोका कायम आहे.

हे सुद्धा वाचा

दोन आठवड्यापासून पाऊस

पुणे घाटमाथ्यांवर गेल्या दोन आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या ठिकाणी राजगड परिसरात संततधार पाऊस होत आहे. त्यामुळे ढिसूळ झालेल्या कड्याचे दगड कोसळत आहेत. दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन पुरातत्व विभागाने बालेकिल्लावर काही दिवस पर्यटकांना बंद केली आहे. तर राजगड, तोरणा गडावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी मावळा जवान संघटनेने केलीय.

वरंधा घाट केला बंद

पुणे शहरातून कोकणाकडे जाण्यासाठी वरंधा घाट हा एक मार्ग आहे. परंतु पुणे घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे दरडी कोसळण्याच्या घटना होत आहेत. रस्ता खचून जाण्याचा प्रकार होतो. यामुळे प्रशासनाने वाहन धारकांसाठी वरंधा घाट बंद केला आहेत वाहनधारकांना ताम्हिनी घाटाचा पर्याय आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.