पुण्याशी संबंधित कंपनीवर ईडीची कारवाई, कोट्यवधींची रक्कम जप्त, काय आहे कारण?

Pune News : हवाला अन् इतर बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या पुणे येथील एका कंपनीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. महिन्याभरात ईडीकडून या कंपनीवर दुसरी कारवाई झाली आहे. त्यात कोट्यवधींची रक्कम जप्त केली आहे.

पुण्याशी संबंधित कंपनीवर ईडीची कारवाई, कोट्यवधींची रक्कम जप्त, काय आहे कारण?
ed
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 3:30 PM

पुणे : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुणे येथील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीजच्या अहमदाबादमधील कार्यालयावर कारवाई केली. महिन्याभरात दोन वेळा केलेल्या या कारवाईत एकूण 31.74 कोटी रुपये जप्त करण्यात आले. दुसऱ्यांदा अहमदाबादमध्ये मारलेल्या छाप्यात 2 कोटींची रोकड अन्10.38 कोटी रुपयांचा बँक बॅलेन्स जप्त केला आहे. विनोद खुटे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून ही कारवाई केली जात आहे.

बेकायदेशीर व्यवहारांची साखळी

ईडीने गेल्या महिन्यात कंपनीच्या पुणे आणि अहमदनगर येथील व्हीआयपीएस ग्रुपच्या कार्यालयाची झडती घेतली होती. त्यात 18.54 कोटी रुपयांची बँक बॅलन्स गोठवली होती. या प्रकरणातील आरोपी विनोद खुटे विदेशात फरार झाला आहे. तो VIPS ग्रुप ऑफ कंपनीजच्या माध्यमातून विविध बेकायदेशीर व्यवहार करतो. त्यात क्रिप्टो एक्स्चेंजसह वॉलेट सेवांचाही समावेश आहे. हवालाद्वारे तो परदेशात पैसे पाठवतो. तसेच तो ई-कॉमर्स शॉपिंग पोर्टलद्वारे उत्पादने विकतो.

बेकायदेशीर योजना

व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीजच्या चौकशीत असे दिसून आले की कंपनी बेकायदेशीर आणि अनधिकृत मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजना चालवत आहे. या ठिकाणी ग्राहक सदस्य होण्यासाठी योजनेची निवड करतात. कुटे याने काना कॅपिटलच्या ब्रोकरेजमध्ये विविध गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपयांचा निधी गोळा केल्याचा आरोप तपास एजन्सीने केला आहे.

हे सुद्धा वाचा

व्याजाच्या योजनेचे आमिष

पुण्यातील धनश्री मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीत विनोद खोटे याने गुंतवणुकदारांना खोट्या योजनांमध्ये आकर्षित करण्याचा उपक्रम सुरु केला. त्यामध्ये तो दरमहा 2-4% उच्च व्याज देण्याचे आमिष दाखवत होता. या योजनेतही गुंतवणूकदारांकडून अनेक कोटींची गुंतवणूक करुन घेतली आहे. ही रक्कम हवाला चॅनेल आणि शेल कंपन्यांद्वारे देशाबाहेर पाठवली गेली असल्याचे तपासात उघड झाले आहे.

'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?.
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.