ईडीची मोठी कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराची 26 कोटींची संपत्ती जप्त

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराची 26 कोटी 26 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. या प्रकरणात त्या माजी आमदाराला मागील वर्षी मार्च महिन्यात अटक झाली होती.

ईडीची मोठी कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराची 26 कोटींची संपत्ती जप्त
अनिल भोसले
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 10:42 AM

पुणे : पिंपरी चिंचवडमधील (pimpri chinchwad) सेवा विकास बँकेचे (seva vikas bank) माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे ईडीने छापेमारी केल्याचे प्रकरण ताजे असताना अजून एक कारवाई झाली आहे. बँकेतील 71 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात (Bank Fraud)अंमलबजावणी संचालयाने (Enforcement Directorate) कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराची 26 कोटी 26 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. या प्रकरणात त्या माजी आमदाराला मागील वर्षी मार्च महिन्यात अटक झाली होती.

पुणे येथील शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील माजी आमदार अनिल भोसले यांच्यांवर कारवाई झाली आहे. त्यांची 26 कोटी 26 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. शिवाजीराव बँक भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात बँकेचे संचालक अनिल शिवाजीराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव, नूसर शनूर मुजावर यांच्यासह अन्य आरोपींवर यापुर्वीच गुन्हा दाखल झाला होता.

काय आहे प्रकरण

हे सुद्धा वाचा

शिवाजीराव भोसले बँकेतील ठेवीदारांची 71 कोटी रुपयांची फसवणूक तत्कालीन संचालकांनी केली होती. या प्रकरणी पुणे येथील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने भोसले यांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. आता ईडीनेही अनिल भोसले यांची पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 26 कोटी 60 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. भोसले यांनी बनावट कर्ज प्रकरणे मंजूर केली होती. त्यामाध्यमातून ठेवीदारांचे पैसे त्यांनी अन्यत्र वळवले होते. यामुळे बँक अडचणीत आली.

कोट्यवधीची संपत्ती

भोसले यांनी 2004मध्ये त्यांची संपत्ती 2 कोटी 92 लाख 68 हजार दाखवली होती. त्यानंतर 2014च्या निवडणुकीत त्यांनी त्यांची एकूण संपत्ती 22 कोटी 1 लाख 8 हजार दाखवली होती, अशी सूत्रांनी माहिती दिली.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये, पुन्हा राष्ट्रवादीत

भोसले हे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत अनिल भोसले आणि अजित पवारांमध्ये रेश्मा भोसले यांना तिकीट देण्यावरून मोठा वादही झाला होता. त्यामुळे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून गणल्या जाणाऱ्या अनिल भोसले यांनी त्यावेळी भारतीय जनता पक्षाशी घरोबा करण्यास सुरुवात केली होती.

या वादानंतर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, भाजपमध्ये त्यांचं मन काही रमलं नाही. काही दिवसानंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला.भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेवर निवडून आले. मात्र, नंतर त्यांच्या पत्नी रेश्मा या अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सहयोगी सदस्य बनल्या होत्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.