ED चे अधिकारी कोल्हापुरात तळ ठोकून, हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार

ED च्य पथकाने शनिवारी मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली होती. यावेळी मुश्रीफ घरात नव्हते. परंतु त्यांची घरी पत्नी आणि इतर कुटुंबीय होते. तब्बल साडे नऊ तास मुश्रीफ यांच्या घरातील कुटुंबियांची चौकशी आणि झाडाझडती सुरु होती

ED चे अधिकारी कोल्हापुरात तळ ठोकून, हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 11:58 AM

भूषण पाटील, कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात सुरु असलेल्या ईडी कारवाई (ED Raid) प्रकरणात अधिकारी कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहे. शनिवारपासून दाखल झालेले ईडीचे अधिकारी अजूनही कागलमध्ये आहेत. दुसरीकडे त्याचवेळी हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाई प्रकरणात न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीकडून सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सच पालन करत नसल्याचा दावा करत मुश्रीफ यांनी याचिका दाखल केली आहे. राजकीय विरोधक असलेले किरीट सोमय्या हे हसन मुश्रीफ यांना टार्गेट करत असल्याचा उल्लेख याचिकेत केला आहे. त्यावर त्यांना अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे.

शनिवारपासून पथक

ED च्य पथकाने शनिवारी मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली होती. यावेळी मुश्रीफ घरात नव्हते. परंतु त्यांची घरी पत्नी आणि इतर कुटुंबीय होते. तब्बल साडे नऊ तास मुश्रीफ यांच्या घरातील कुटुंबियांची चौकशी आणि झाडाझडती सुरु होती. त्यावेळी हसन मुश्रीफ नॉट रिचेबल झाले होते. सोमवारी ईडीचे पथक कोल्हापुरात असताना हसन मुश्रीफ कागलमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.ईडीच्या कारवाईविरोधात आपण हायकोर्टात गेल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी उच्च न्यायालयाने त्यांना दोन आठवडे अटक करण्यास मनाई केली आहे. यामुळे त्यांना अटक होणार नसली तरी त्यांची चौकशी सुरु राहणार आहे. कारण शनिवारच्या छाप्यानंतरही ईडी अधिकारी कोल्हापुरातच आहे. यामुळे मुश्रीफांच्या अडचणी वाढणार आहेत.

हे सुद्धा वाचा

ईडीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील (Kolhapur District Bank) काही आजी माजी संचालकांची चौकशी केली होती. ईडीने (ed) जिल्हा बँकेतील पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. आता पुन्हा ईडीचे पथक कोल्हापुरात पोहचले आहेत आणि तळ ठोकून बसले आहे.

का झाली चौकशी

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. त्याचे पुरावे त्यांनी ईडीकडे सादर केल्याचा दावा केला आहे. मुश्रीफ यांनी बेनामी संपत्ती गोळा केली असून त्यांनी मनी लाँड्रिंग, बोगस कंपन्याच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार केले आहेत. यात पत्नी साहिरा मुश्रीफ, त्यांचा मुलगा नाविद मुश्रीफ यांचाही सहभाग आहे. त्याचे 2700 पानी पुरावे आपण दिल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.