IMD Temperature | यंदा उन्हाळ्यात जाणवणार ‘सुपर एल निनो’चा प्रभाव, काय होणार परिणाम

Super El Nino Next Year | यंदा पावसाळ्यात एल निनोचा प्रभाव दिसला. यामुळे देशातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली नाही. यामुळे यंदा दुष्काळाचे सावट असण्याची शक्यता आहे.

IMD Temperature | यंदा उन्हाळ्यात जाणवणार 'सुपर एल निनो'चा प्रभाव, काय होणार परिणाम
Super El Nino
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 7:50 AM

पुणे, | 17 ऑक्टोंबर 2023 : मॉन्सून यंदा उशिराने आला. नेहमी 7 जून रोजी महाराष्ट्रात दाखल होणारा मॉन्सून 25 जून रोजी दाखल झाला. त्यानंतर जुलै महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्यात तब्बल 21 दिवस पावसाने दडी मारली. सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला तरी बऱ्यापैकी बरसला नाही. यामुळे यंदा जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने निर्माण केलेली तूट भरुन निघाली नाही. भारतीय मॉन्सूनवर यंदा एल निनोचा प्रभाव होता. आता यंदा उन्हाळा कसा असणार? या संदर्भात हवामान विभागाने अपडेट दिले आहे. यंदा उन्हाळ्यात ‘सुपर एल निनो’चा प्रभाव असणार आहे.

आता 2024 चा उन्हाळा कसा असणार

पावसाळ्यानंतर उन्हाळ्यात ‘सुपर एल निनो’चा प्रभाव असणार आहे. मार्च ते मे 2024 मध्ये ‘सुपर एल निनो’चा प्रभाव दिसणार आहे. यामुळे सरासरी तापमान 1.5 डिग्री सेल्सियस जास्त असणार आहे. सरासरी तापमान 2 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असण्याची शक्यताही 30 टक्के आहे. यंदा प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ स्थितीची तीव्रता वाढल्याचा हा परिणाम आहे. अमेरिकेतील ‘नॅशनल ओशनिक अ‍ॅण्ड अ‍ॅटमोस्फेरिक एडमिनिस्टेशन’ (नोआ) या संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे. यासंदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे. यापूर्वी या संस्थेने यंदाच्या पावसाळ्यात भारतात ‘एल निनो’चा प्रभाव असण्याचे म्हटले होते.

यापूर्वी कधी होता ‘सुपर एल निनो’चा प्रभाव

‘सुपर एल निनो’चा प्रभाव भारतात यापूर्वी सात, आठ वर्षांपूर्वी होता. 1997-98 मध्ये ‘सुपर एल निनो’ होता. त्यानंतर पुन्हा 2015-16 मध्ये ‘सुपर एल निनो’चा प्रभाव होता. ‘सुपर एल निनो’मुळे वाढलेले तापमान, दुष्काळ आणि पूर अशी आपत्ती निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच या ‘सुपर एल निनो’मुळे भारतातील मॉन्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

असा परिणाम होणार?

‘सुपर एल निनो’मुळे भारतातील हवामान प्रणालीत मोठा बदल होण्याचा धोका आहे. या परिस्थितीत तीव्र हवामान घटना घडतात. कधी काही भागात मुसळधार पाऊस पडतो. तर कुठे तापमान जास्त असते. तसेच पावसात मोठा खंड पडतो. उत्तर भारतात ‘सुपर एल निनो’चा धोका दक्षिण भारतापेक्षा अधिक आहे. हवामान विभागाच्या या इशाराऱ्यानंतर अन्नधान्याचा साठा सरकारला करुन ठेवावा लागणार आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.