Election| तब्बल सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होणार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघची निवडणूक; किती जागा ? कोणत्या तारखेला? पाहा इथे
संघाच्या संचालक पदाच्या 16 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड ,शिरूर ,मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर आणि दौंड या अकरा तालुक्यांसाठी दूध उत्पादक सोसायटी यांचा प्रत्येकी एका गटातून एक संचालक निवडला जाईल.
पुणे- महाराष्ट्र सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघची निवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे दूध संघाता पुन्हा निवडणुकेचे वारे वाहू लागले आहे. येत्या २ मार्चलही निवडणूक होणार आहे. त्यासाठी येत्या सोमवार (दि. 14 फेब्रुवारपासून) अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार आहे. निवडणुकीसाठी निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद सोबले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड ,शिरूर ,मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर आणि दौंड या अकरा तालुक्यांसाठी दूध उत्पादक सोसायटी यांचा प्रत्येकी एका गटातून एक संचालक निवडला जाईल. महिला संचालकासाठी दोन जागा असून , अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती आणि इतर मागास वर्गासाठी प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होईल.
संघाच्या संचालक पदाच्या 16 जागांसाठी निवडणूक महाराष्ट्र सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद सोबले यांची नियुक्ती केली. सोबले यांनी सहकारी निवडणूक प्राधिकरणाला सादर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी दिल्याचे पत्र प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिले आहे. संघाच्या संचालक पदाच्या 16 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड ,शिरूर ,मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर आणि दौंड या अकरा तालुक्यांसाठी दूध उत्पादक सोसायटी यांचा प्रत्येकी एका गटातून एक संचालक निवडला जाईल. महिला संचालकासाठी दोन जागा असून , अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती आणि इतर मागास वर्गासाठी प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होईल.
निवडणूक कार्यक्रम
– उमेदवारी अर्ज दाखल करणे : 14 ते 18 फेब्रुवारी – उमेदवारी अर्जांची छाननी : 21 फेब्रुवारी – वैध उमेदवारांची यादी जाहीर करणे : 22 फेब्रुवारी – उमेदवार अर्ज मागे घेणे : 22 फेब्रुवारी ते 8 मार्च – चिन्ह वाटप : 9 मार्च – मतदान : 20 मार्च सकाळी 9 ते सायंकाळी 5 – मतमोजणी : 21 मार्च
Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, दराचे काय..? रब्बीतील एका पिकानेच बदलले चित्र..!