नो टेन्शन! सध्या नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्राशिवाय मिळणार अकरावी प्रवेश
अकरावीसाठी मागासवर्गीय (Backward Class) आणि अनुसूचित जाती-जमातीच्या (SC-ST) आरक्षणातून (Reservation) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्रं जमा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पुणे : अकरावीसाठी मागासवर्गीय (Backward Class) आणि अनुसूचित जाती-जमातीच्या (SC-ST) आरक्षणातून (Reservation) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्रं जमा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे प्रमाणपत्र सादर करणं शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्राशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सोबतच प्रमाणपत्र सादर करण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. (Eleven admissions have been extended for issuing non creamy layer certificate)
प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ
यापूर्वी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली होती. ती वाढवून आता 30 दिवस करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश निश्चिती करताना सुरूवातीला नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पावती सादर करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. पण त्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचं लक्षात आल्यानंतर आता पालकांना 30 दिवसांच्या आत नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करू या आशयाच्या हमीपत्रावरही प्रवेश दिला जाणार आहे.
हमीपत्र दिल्यास प्रवेशाचा मार्ग मोकळा
पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) हद्दीतल्या विद्यार्थ्यांना जवळच्या ई-सुविधा केंद्रामध्ये नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान, ई-सुविधा केंद्रांनाही विद्यार्थ्यांची अडवणूक न करता तातडीने नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तरीही पालकांना काही अडचणी आल्या, प्रमाणपत्र अर्जाची पावती मिळाली नाही तर घाबरून न जाता पालकांनी हमीपत्र दिल्यास विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातल्या ३११ महाविद्यालयातल्या एक लाख 11 हजार 285 जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. पहिल्या फेरीतल्या 56 हजार 767 विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी पहिल्या यादीत 38 हजार 858 विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट करण्यात आली आहेत.
त्यात 14 हजार 108 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये 37 महाविद्यालयांनी प्रवेश नाकारले आहेत. तर 12 विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
इतर बातम्या :