Pune accident : पिकअप ट्रकने रिक्षाला मागून दिली धडक, उरुळी कांचनमधले 11 विद्यार्थी जखमी

उरुळी कांचनमधील (Uruli Kanchan) महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या (Students) रिक्षाला (Rickshaw) अपघात (Accident) झाला आहे. अकरा विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Pune accident : पिकअप ट्रकने रिक्षाला मागून दिली धडक, उरुळी कांचनमधले 11 विद्यार्थी जखमी
उरुळी कांचनमध्ये रिक्षाला झालेला अपघातImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 11:27 AM

पुणे : उरुळी कांचनमधील (Uruli Kanchan) महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या (Students) रिक्षाला (Rickshaw) अपघात (Accident) झाला आहे. अकरा विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाळकरी मुलांच्या वाहनांना अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. कधी जास्त वेगामुळे तर कधी वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे अपघात होत आहेत. अनेकवेळा क्षमतेपेक्षा अधिका विद्यार्थी वाहनांमध्ये बसवले जातात. एकतर वाहन लहान असते. त्यात अतिरिक्त माणसे बसवल्याने वजन पेलवण्याची क्षमता या वाहनांमध्ये नसते. त्यामुळे वाहने पलटी झाल्याचेही प्रकार पहावयास मिळतात. आता या खासगी रिक्षाला अपघात झाला आहे. रस्त्याकडील झुडपात ही रिक्षा घुसल्याचे दिसत आहे. यात जवपास अकरा विद्यार्थी जखमी झाले.

7.30च्या सुमारास झाला अपघात

पुणे ग्रामीण हद्दीतील यवत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले, की हा अपघात उरुळी कांचन शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर सकाळी 7.30 च्या सुमारास झाला. रिक्षात उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील सुमारे 12 विद्यार्थी होते. प्राथमिक माहितीनुसार जखमी विद्यार्थ्यांचे वय 7 ते 12 वर्षे आहे.

रिक्षाचे नुकसान

अधिकारी पुढे म्हणाले, की बाजारात द्राक्षे घेऊन निघालेल्या पिकअप ट्रकने सोलापूर ते पुणे लेनवर रिक्षाला मागून धडक दिली. धडकेमुळे रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून चालक व 10 ते 12 विद्यार्थी जखमी झाले आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. चालक आणि गंभीर जखमी झालेल्या काही विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी वाचा :

MNS Vasant More : ‘लोकप्रतिनिधी म्हणून मांडलेल्या भूमिकेवर आजही ठाम, राज ठाकरे माझ्या मनात; पक्ष सोडणार नाही’

Aurangabad | “दोघांच्या संमतीने चार भिंतीच्या आत…” कीर्तनकाराच्या अश्लील व्हिडीओवर तृप्ती देसाईंचं परखड मत

Pune CCTV | कारला धडकून लक्झरी बस पलटी, हॉटेलमध्ये घुसून 25 प्रवासी जखमी, पुण्यातील अपघाताची भीषण दृश्यं

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.