“पेटेन उद्या मी नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही”; 2024 साठी कसब्यात बॅनर झळकले…

कसबा पोटनिवडणूक होण्याआधीपासूनच चर्चेत आली होती, मात्र आता कसबा मतदार संघ चर्चेत आला आहे तो बॅनरबाजीमुळे, पण निवडणुका लांब असतानाही आता हे बॅनर का झळकले याचीच चर्चा आता जोर धरू लागली आहे.

पेटेन उद्या मी नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही; 2024 साठी कसब्यात बॅनर झळकले...
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 8:30 PM

पुणेः नुकताच झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये कसब्याचीही पोटनिवडणूक प्रचंड चुरशीत पार पडली आहे. पोटनिवडणुकीच्या रिंगणात विजयी झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यामध्ये मोठी चुरस झाली. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मतदारांचे आभारही मानले आहेत. या घटना ताज्या असतानाच आता भाजपचे कसब्यातील उमेदवार हेमंत रासने यांच्याकडून आतापासूनच कसब्यात जनसंपर्क कार्यालय उघडण्याची घोषणा होऊन बॅनरही झळकले आहेत. या बॅनरवर त्यांनी पेटेन उद्या मी नव्याने हे सामर्थ नाशवंत नाही अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत.

त्यामुळे कसबा मतदार संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कसबा पोटनिवडणुकीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते.

प्रत्येक उमेदवारांना आपापल्या उमेदवारीवर विश्वास व्यक्त करत या निवडणुकीत विजय आपलाच आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता.

त्यानंतर या निवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाले होते मात्र आता या निवडणुकीनंतरही हेमंत रासने यांनी बॅनरबाजी करत पेटेन उद्या मी नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही असा इशाराच विरोधकांना त्यांनी दिला आहे.

भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी ‘पेटेन उद्या मी नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही’ अशी बॅनरबाजी तर केली आहेच मात्र त्याचबरोबर आता कसब्यातील प्रत्येक विभागात जनसंपर्क कार्यालयही उघडणार असल्याचे त्यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता आणि या कसबा मतदारसंघाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

पुण्यातील कसब्यात आताच हे बॅनर लागल्यामुळे या बॅनरची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ‘पेटेन उद्या मी नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही’ या आशयाचे बॅनर लागल्यामुळे भाजपसह विरोधकांमध्येही याची जोरदार चर्चा होऊ  लागली आहे.

त्यामुळे 2024 ची निवडणुकीला अजून बराच कालावधी असला तरी हेमंत रासने यांच्या या बॅनरबाजीमुळे कसबा मतदार संघाकडे आता साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.