AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांची हकालपट्टी करा, स्वपक्षासहीत विरोधी पक्षाकडून मागणी

नियमबाह्य कामासाठी महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्तांना शिवीगाळ करणे तसंच खंडणी मागण्याचे गंभीर आरोप आता उपमहापौर राजेश काळे यांना चांगलेच महागात पडणार आहेत.

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांची हकालपट्टी करा, स्वपक्षासहीत विरोधी पक्षाकडून मागणी
| Updated on: Dec 31, 2020 | 11:28 AM
Share

सोलापूर : नियमबाह्य कामासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्तांना शिवीगाळ करणे तसंच खंडणी मागण्याचे गंभीर आरोप आता उपमहापौर राजेश काळे यांना चांगलेच महागात पडणार आहेत. राजेश काळे यांना स्वपक्ष म्हणजे भाजपातून तसंच उपमहापौरपदावरुन हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी भाजपसह विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे. तर आज उपमहापौर राजेश काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. (Expulsion Rajesh Kale As A Deputy Mayor of Solapur Demand bjp And opposition Party)

सोलापूर येथील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी इ -टॉयलेट सह अन्य आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी उपमहापौर राजेश काळे यांनी पालिका उपायुक्त धनराज पांडे यांना फोनवरून अर्वाच्च शिवीगाळ केली. ही कामे नियमबाह्य असल्याचे सांगत यासाठी पत्र व्यवहार होणे अपेक्षित असल्याचं पांडे यांनी उपमहापौर राजेश काळे यांना सांगितल्यानंतर संतापलेल्या काळे यांनी पांडे यांना अर्वाच्य शिवीगाळ केली.

याप्रकरणी पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी सदर बझार पोलिसात वारंवार खंडणी मागणे व शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कसल्याही परिस्थितीत नियमबाह्य कामे आणि कर्मचाऱ्यावर दबाव आणून कामे करून घेणे खपवून घेणार नसल्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.

दुसरीकडे भाजपातील काही लोकांनीच माझ्याविरूद्ध षडयंत्र रचल्याचा राजेश काळे यांनी आरोप केला आहे. मी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे मात्र खंडणी मागितले नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच पोलिस चौकशीला सामोरे जाण्याची तयारी सुद्धा काळे यांनी दाखवली आहे.

उपमहापौर राजेश काळे यांनी केलेल्या शिवीगाळीचे पडसाद आता पालिका वर्तुळात कालपासून दिसू लागले आहेत. काल (बुधवारी) दिवसभर कर्मचार्‍यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर या घटनेचा निषेध केला आहे. पालिकेच्या कॅबिनेट पदावर असताना पदाचे भाग आणि मान न ठेवता शिवीगाळ करणाऱ्या उपमहापौरांना तात्काळ अटकेच्या मागणीसाठी आज कर्मचारी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

उपमहापौर राजेश काळे यांच्यावर हा काही पहिलाच गुन्हा नाही. याआधी त्यांच्यावर जुळे सोलापूर येथील जागेच्या वादातून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. शिवाय भाजपचे माजी महापौर किशोर देशपांडे यांना शिवीगाळ, भाजपातील महिला सदस्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, यापूर्वीचे आयुक्त दीपक तावरे यांच्या बद्दल अपशब्द वापरणे, कोरोनाच्या काळात प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात अडथळा आणलाचा काळेंवर आरोप आहे.

दरम्यान या घटनेची भाजपानेही दखल घेतली असून वारंवार सांगूनही भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलीन केली आहे. त्यामुळे चोवीस तासाच्या आत खुलासा करण्याचा इशारा काळे यांना देण्यात आला आहे. अन्यथा तुम्हाला पक्षातून बडतर्फ का करु नये? असा सवाल नोटीसीत विचारण्यात आला आहे. (Expulsion Rajesh Kale As A Deputy Mayor of Solapur Demand bjp And opposition Party)

संबंधित बातम्या

सोलापूरच्या उपमहापौरांवर आधी खंडणीचा गुन्हा, आता पक्षाची शिस्तभंग नोटीस, पुढे काय होणार?

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.