AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे येथील येरवडा कारागृहात सुरु होणार राज्यातील पहिला उपक्रम

Pune News : पुणे येथील येरवडा कारागृहात नवीन सुविधा सुरु केली आहे. या सुविधेचा फायदा सर्वच कैद्यांना होणार आहे. पुणे येथील हा प्रयोग यशस्वी झाला तर त्यांची अंमलबजावणी राज्यभरात करण्यात येणार आहे.

पुणे येथील येरवडा कारागृहात सुरु होणार राज्यातील पहिला उपक्रम
yerwada jail
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 4:33 PM

अभिजित पोते, पुणे : पुणे शहरातील येरवडा कारागृहाला ऐतिहासिक महत्व आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल आणि मोतीलाल नेहरू यांच्यासह असंख्य स्वातंत्र्य सैनिक या कारागृहात राजकीय कैदी होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी या ठिकाणी त्यांनी तुरुंगवास भोगला होतो. अगदी 1932मध्ये येरवडा तुरुंगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात पुणे करार झाला होता. इंग्रजांचे पुण्यातील कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड यांच्या हत्येप्रकरणी चाफेकर बंधूंना या ठिकाणी फाशी दिली होती. अशा या ऐतिहासिक कारागृहात कैद्यांसाठी नवीन सुविधा सुरु करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही सुविधा आहे.

काय होणार कैद्यांसाठी सुरु

पुण्यातील येरवडा कारागृहामधील कैद्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. येरवडा कारगृहात असणाऱ्या कैद्यांना फोनची सुविधा मिळणार आहे. त्यांना या फोनमुळे कुटुंबाशी संवाद साधता येणार आहे. प्रत्येक महिन्यातून ३ वेळा घरच्यांशी किंवा नातेवाईकांशी त्यांना फोनवर बोलता येणार आहे. अपर पोलिस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते आज येरवडा कारागृहात स्मार्ट कार्ड फोन सुविधेच उद्घाटन करण्यात आलं.

का घेतला निर्णय

कैद्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिकेतच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. कैद्यांना महिन्यातील ३ वेळा ही सुविधा उपलब्ध असेल. प्रत्येक कॉलवर कायद्याला आपल्या घरच्यांसोबत किंवा आपल्या आप्तेष्टांसोबत १० मिनिटे बोलता येणार आहे. म्हणजेच एक कैदी महिन्यातून 30 मिनिटे आपल्या घरच्यांशी बोलू शकणार आहे. स्मार्ट कार्ड फोन सुविधा हा राज्यभरातील पहिला प्रकल्प आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात सुरु होणार

पुण्यातील येरवडा कारागृहात सुरू करण्यात आलेल्या हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर आहे. त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर राज्यातील इतर कारागृहात हा सुरू करण्यात येईल. या सुविधेमुळे कैद्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. कैद्याचे आरोग्य अन् मानसिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी विविध प्रयोग कारागृहात केली जातात. त्यासाठी सामजिक संस्थांचीही मदत घेतली जाते.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.