Fact Check : पुण्यात सिम्बॉसिसमध्ये मोफत उपचार मिळतायत? काय आहे वस्तुस्थिती?

पुण्यातील सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालयात सर्व प्रकारचे उपचार मोफत दिले जात आहेत. (Fact Check Pune Symbiosis Hospital Give Free treatment)

Fact Check :  पुण्यात सिम्बॉसिसमध्ये मोफत उपचार मिळतायत? काय आहे वस्तुस्थिती?
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 9:16 PM

पुणे : पुण्यातील सिंबायोसिस रुग्णालयामध्ये आता सर्वसामान्यांना मोफत उपचार दिले जातात, असा मॅसेज व्हायरल होत आहे. सिंबायोसिस मेडिकल कॉलेजमधील रुग्णालयात गरीब, श्रीमंत असा कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांना सर्व प्रकारचे उपचार मोफत दिले जात आहेत, असा दावा या मॅसेजमध्ये केला आहे. नुकतंच याबाबतचा फॅक्ट चेक करुन त्यामागील तथ्य समोर आले आहेत. (Fact Check Pune Symbiosis Medical College Hospital Give Free treatment)

व्हायरल होणाऱ्या मॅसेजमधला दावा काय? 

पुण्यातील सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालयात सर्व प्रकारचे उपचार मोफत दिले जात आहेत. या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाकडून एकही रुपया आकारला जात नाही. तसेच व्हीआयपी ट्रिटमेंट घेणाऱ्यांकडून नाममात्र शुल्क आकारले जाते. या ठिकाणी गरीब, श्रीमंत असा कोणताही भेदभाव केला जात नाही, असा मॅसेज गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे.

मॅसेजमागील तथ्य काय? 

देशात महिला डॉक्टरांची संख्या केवळ 17 टक्के असून त्यात वाढ व्हावी. हा उदात्त हेतू समोर ठेवून सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी केवळ मुलींसाठी मेडिकल कॉलेज असावे, अशी इच्छा व्यक्त केली. वडिलांच्या इच्छापूर्तीसाठी कामाला लागलो आणि पाहता पाहता मेडिकल कॉलेज साकार झाले. या मेडिकल कॉलेज साठी सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय सुरू करण्यात आले. त्यात गरीब,श्रीमंत असा कोणताही भेद न ठेवता सर्वांना सर्व प्रकारचे उपचार पूर्णपणे मोफत दिले जात आहेत.

गेल्या 1 जानेवारीपासून सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालयात उपचार दिले जात आहेत. मार्च महिन्यात कोरोना साथ आली.  त्यामुळे कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी 500 खाटांची व्यवस्था केली. कोरोना काळात तब्बल 3 हजार 800 रुग्णांवर उपचार करण्यात आले. या रुग्णालयात सर्व प्रकारचे उपचार मोफत देत आहोत. रुग्णालयात बिलिंग डिपार्टमेंट नसल्याने त्यांच्याकडून एकही रुपया आकारला जात नाही. तसेच एखाद्या व्यक्तीला व्हीआयपी हवी असेल तर ती सुद्धा व्यवस्था नाममात्र शुल्कात उपलब्ध आहे.

कॉलेज सुरु करण्यामागची गोष्ट

मुजुमदार सरांनी “आनंदी गोपाळ’ हा सिनेमा पाहिला. त्यानंतर त्यांनी मुलींसाठी स्वतंत्र मेडिकल कॉलेज सुरू करण्याची इच्छा बोलून दाखवली. मी आणि राजीव येरवडेकर दोघेही डॉक्टर असल्यामुळे मेडिकल कॉलेज सुरू करण्याबाबत येणाऱ्या अडचनींची आम्हाला कल्पना होती.त्यामुळे मेडिकल कॉलेज सुरू न करण्याचा निर्णय घेतला होता.परंतु आपण काही तत्व समोर ठेवून मेडिकल कॉलेज सुरू करण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे,असे स्वतः मुजुमदार सरांनी सांगितल्याने मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला.

लवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठच्या आसपासची सुमारे 22 खेडी आम्ही दत्तक घेतली आहेत. या खेड्यांमधील नागरिकांनी आमच्यासाठी विद्यापीठाने रूग्णालय सुरू करावे, अशी भावना बोलून दाखवली. सिंबायोसिस नर्सिंग कॉलेज आणि मेडिकल टेक्नॉलॉजीचे कॉलेज असल्यामुळे आम्ही सुरुवातीला 100 खाटांच्या हॉस्पिटलचे बांधकाम सुरू केले होते. मात्र त्यातच मुजुमदार सरांनी मेडिकल कॉलेज सुरू करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानुसार आम्ही सर्व पातळ्यांवर काम करून अवघ्या दहा महिन्यात 300 खाटांचे रुग्णालय उभे केले.

हेही वाचा – Fact Check : व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तुमचे कॉल रेकॉर्ड होतात का? व्हायरल होणाऱ्या मॅसेजमागील सत्य काय?

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दर्जा आणि ससून रुग्णालयाचे शुल्क अशा प्रकारच्या हॉस्पिटल मुळशी उभा राहावे, अशी स्थानिकांची भावना होती. त्यानंतर रुग्णालय सुरु करण्यात आले.

“नवीन शैक्षणिक धोरण समोर ठेवून सिंबायोसिस तर्फे बाणेर परिसरात एक शाळा सुरू केली जाणार आहे . नव्या धोरणात पाच + तीन + तीन + चार अशी पद्धत आहे त्याच धर्तीवर या शाळेची रचना केली आहे हे सिंबायोसिस वर्ल्ड स्कूल 2022 मध्ये सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे . त्यासाठी समितीचे अध्यक्ष डॉक्टर कस्तुरीरंगन यांचे मार्गदर्शन घेतले आहे त्यामुळे नव्या धोरणानुसार देशातील ही पहिली शाळा ठरू शकते,” अशी माहिती सिंबायोसिस विद्यापीठाच्या प्रधान संचालिका डॉक्टर विद्या येरवडेकर यांनी दिली.  (Fact Check Pune Symbiosis Medical College Hospital Give Free treatment)

संबंधित बातम्या : 

इमानदार ! मालक हॉस्पिटलमध्ये, दोस्तानं गेटवर ठाण मांडलं !

Trending | रात्री सहज उठला आणि बनला 75 कोटींचा मालक, जाणून घ्या संपूर्ण कहाणी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.