TET Exam scam | पेनड्राईव्हमध्ये माहिती भरून देत, हरकळ बंधूंना दिले 80 लाख ; आरोपी सूर्यवंशीची धक्कादायक माहिती

आरोपी मुकुंदा सुर्यवंशीने दिलेल्या माहिती नंतर आता या पेनड्राईव्हमध्ये माहिती दिलेले विद्यार्थी कोण आहेत याचा शोधही पोलिसांकडून केला जात आहे. मार्क वाढवण्यासाठी परीक्षार्थी कोणामार्फत आरोपींच्या संपर्कात आले आहेत? ते आरोपी सूर्यवंशी पर्यंत कसे पोहचले. नेमकं किती पैसे दिलेत या सगळयाचा शोध पोलीस घेणारा आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपी मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशीला 21 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

TET Exam scam | पेनड्राईव्हमध्ये माहिती भरून देत, हरकळ बंधूंना दिले 80 लाख ; आरोपी सूर्यवंशीची धक्कादायक माहिती
pune-police
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 10:23 AM

पुणे – राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा 2018 (टीईटी)(TET Exam scam )परीक्षेच्या घोटाळ्याची व्यापती दिवसेंदिवस वाढत आहे. या घोटाळ्यातील आरोपिंना अटक करण्याचे काम सुरु असताना दुसरीकडे रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी ( वय 33 नाशिक) (Mukunda Jagannath Suryavanshi) या आरोपीला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2018 मध्ये परीक्षार्थींची यादी पेनड्राईव्हमध्ये(pen drive) भरून हरकळ बांधून दिली होती. याचबरोबर विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले तब्बल 80  लाख रुपयांची रोख रक्कम एजंट संतोष लक्ष्मण हरकळ आणि अंकुश रामभाऊ हरकळ यांना आणून देण्यात आल्याचे सांगितले आहे.

सखोल तपास सुरु

टीईटी घोटाळ्यातील गुन्ह्याची व्याती खूप मोठी आहे. त्यामुळे यातील प्रत्येक आरोपीकडे कसून चौकशी करण्यावर पोलीस या भर देत आहेत. आरोपी मुकुंदा सुर्यवंशीने दिलेल्या माहिती नंतर आता या पेनड्राईव्हमध्ये माहिती दिलेले विद्यार्थी कोण आहेत याचा शोधही पोलिसांकडून केला जात आहे. मार्क वाढवण्यासाठी परीक्षार्थी कोणामार्फत आरोपींच्या संपर्कात आले आहेत? ते आरोपी सूर्यवंशी पर्यंत कसे पोहचले. नेमकं किती पैसे दिलेत या सगळयाचा शोध पोलीस घेणारा आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपी मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशीला 21 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

घोटाळ्यात कोट्यवधींची उलाढाल

पुणे पोलिसांनी यापूर्वी जी ए. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख आणि शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या सांगण्यावरून जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विनकुमार शिवकुमार (रा. बंगळूर) याला पाच कोटी 37 लाख रुपये देण्यात आल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले होते. तसेच अटक करण्यात आलेले एजंट संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांनी नाशिक, जळगाव, जालना, बुलढाणा जिल्ह्यातील पाच एजंटाकडून हे पैसे जमा केले होते. त्यानंतर डॉ. देशमुख आणि सावरीकर यांच्या सांगण्यावरून ते शिवकुमार याला दिले. आश्विनकुमार याने टीईटी – 2028 मधील 600ते 700 परीक्षार्थींचे गुण वाढविण्यासाठी त्यास मिळालेल्या पाच कोटी रुपयांपैकी दोन कोटी जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक गणेशन याला, राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरे यांना 20  लाख रुपये तर शिक्षण परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे यास30  लाख रुपये दिले असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र यामध्येअजूनही आर्थिक व्यवहारांची देवाण घेवाण झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने तपासही सुरू आहे.

Crop Insurance: पीकविम्याच्या 4 लाख पूर्वसूचना ठरल्या अपात्र, चूक शेतकऱ्यांची की विमा कंपन्याची..!

Shiv Jayanti 2022 | सोलापूरमध्ये गुलाल उधळत शिवजन्मोत्सव साजरा

झोप लागत नाही? हा घ्या जालीम उपाय.. मधुमेहासह हे 6 आजार होतील दूर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.