Pune fire incident : अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक, पुण्यातल्या महुडे गावच्या शेतकऱ्याचं पाच लाखांचं नुकसान

भोर तालुक्यातील महुडे या गावात सोपान बदक यांच्या घरातील ही आग अतिशय भीषण स्वरुपाची होती. यात मोठ्या प्रमाणावर घरातील वस्तू तसेच शेतीउपयोगी साहित्यही जळून खाक झाले आहे. यात घरातील अन्न धान्य, कपडे, जनावरांचा चारा, 28 हजारांची रोख रक्कम यासह अन्य वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

Pune fire incident : अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक, पुण्यातल्या महुडे गावच्या शेतकऱ्याचं पाच लाखांचं नुकसान
आगीत जळून खाक झालेले घरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 9:52 AM

पुणे : पुण्यातल्या भोर तालुक्यातील महुडे गावातील घराला अचानक आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र सोपान बदक या शेतकऱ्याचे सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गोठ्यात बांधलेल्या जनावरांना (Cattle) वेळीच बाहेर काढल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. मात्र आगीत जनावरांसाठी साठवलेला चारा जळून खाक झाल. आग कशामुळे लागली होती, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान बदक यांच्या घरातून धुराचे लोट दिसू लागल्यानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशामकाची (Firebrigade) गाडी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर गावकरी आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी ही आग आटोक्यात आणली.

घरातील वस्तू जळून खाक

भोर तालुक्यातील महुडे या गावात सोपान बदक यांच्या घरातील ही आग अतिशय भीषण स्वरुपाची होती. यात मोठ्या प्रमाणावर घरातील वस्तू तसेच शेतीउपयोगी साहित्यही जळून खाक झाले आहे. यात घरातील अन्न धान्य, कपडे, जनावरांचा चारा, 28 हजारांची रोख रक्कम यासह अन्य वस्तू जळून खाक झाल्या आहेत. तर जवळपास यामुळे सुमारे 5 लाखांचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. घराचे छतही यामुळे उडाले आहे. समोर आलेल्या व्हिडिओमधून या आगीची दाहकता दिसून येते.

आधीच नैसर्गिक संकट, त्यात…

शेतीच्या संकटांना आधीच शेतकरी हैराण झाला आहे. महागाई वाढल्यामुळे सर्वच शेतीसंबंधीच्या बाबी महाग झाल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात पैसा जात आहे. त्यात अशाप्रकारच्या संकटांमुळे अधिकच भर पडत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या आगीमुळे संबंधित शेतकरी हवालदिल झाला आहे. घर पूर्ण जळून खाक झाले आहे. अचानक आग लागल्यामुळे गावकऱ्यांचीही मोठी धावपळ झाली. त्यांनी आग विझवण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला. मात्र आग मोठी होती. लगेचच अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. त्यानंतर काही वेळात अग्निशामकच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.