Video : ही रोषणाई नाही! कात्रज बोगद्याजवळच्या डोंगरावर भीषण वणवा, पीकांसह फळंही खाक

पुणे बंगळुरू मार्गावरील कात्रज (Katraj) नवीन बोगद्याच्या (Tunnel) आसपासच्या परिसरातील डोंगरांवर भीषण वणवा (Fire) लागल्याची घटना घडली आहे. यात आसपासचे संपूर्ण डोंगरच्या डोंगर जळून खाक झाले आहेत.

Video : ही रोषणाई नाही! कात्रज बोगद्याजवळच्या डोंगरावर भीषण वणवा, पीकांसह फळंही खाक
कात्रज बोगद्याजवळच्या डोंगरावरचा वणवाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 10:37 AM

पुणे : पुणे बंगळुरू मार्गावरील कात्रज (Katraj) नवीन बोगद्याच्या (Tunnel) आसपासच्या परिसरातील डोंगरांवर भीषण वणवा (Fire) लागल्याची घटना घडली आहे. यात आसपासचे संपूर्ण डोंगरच्या डोंगर जळून खाक झाले आहेत. वणव्यामुळे डोंगरांवर रोषणाई केल्यासारखे दृश्य दिसत होते. वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे डोंगरावर असणाऱ्या करवंद, बोरं, आंबा याबरोबरच इतर जंगली वनस्पती आणि फळे वाया जात आहेत. शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान यामुळे झाले आहे. त्याचबरोबर सरपटणारे प्राणी, पक्षी यांसारख्या वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. वणव्यांपासून वनसंपदेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून आणि पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी ही घटना घडली असल्याने अशावेळी तो विझवणेही अवघड होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

आधीही घडल्या घटना

कात्रजच्या नव्या बोगद्याजवळ याआधीही वणव्याच्या घटना घडल्या आहेत. एकदा तर अभिनेता सयाजी शिंदे यांनी अग्निशामक दलाला कॉल करून आग लागल्याची माहिती दिली होती. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. तर आणखी एका घटनेत रस्त्याच्या कडेला कुणीतरी टायर पेटवून दिल्याने सर्वत्र वणवा पेटला होता. वाळलेल्या गवतामुळे सर्वत्र आग पसरली होती.

वणव्याचा व्हिडिओ पाहा –

आणखी वाचा :

Pune : मित्रांची हुल्लडबाजी जीवावर बेतली, अंगाला लावलेली माती काढण्यासाठी पाण्यात उतरलेला तरुण खडकवासला धरणात बुडाला

Ajit Pawar : सरळ देत नसतील तर बोट वाकडं करावं लागतं, टनामागे 10 रुपये देण्यावरून अजित पवारांचा कारखान्यांना इशारा

गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं महामंडळ होतंय, त्यांच्या वारसांना संधी मिळाली पण जमलं नाही, धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.