Rajiv Gandhi Zoological Park : प्राण्यांनाही वाटेल गारेगार; उन्हापासून वाचण्यासाठी कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात आता फॉगर
पुण्यातील राजीव गांधी कात्रज प्राणिसंग्रहालयात (Rajiv Gandhi Zoological Park & Wildlife Research, Katraj) वाघांचे (Tiger) उन्हापासून रक्षण व्हावे, यासाठी फॉगर (Fogger) लावण्यात आले आहेत. प्राण्यांची उन्हाळ्यात विशेष काळजी घेतली जात आहे.
पुणे : पुण्यातील राजीव गांधी कात्रज प्राणीसंग्रहालय (Rajiv Gandhi Zoological Park & Wildlife Research, Katraj) याठिकाणी वाघांचे (Tiger) उन्हापासून रक्षण व्हावे, यासाठी फॉगर (Fogger) लावण्यात आले आहेत. प्राण्यांची उन्हाळ्यात विशेष काळजी घेतली जात आहे. उन्हाळ्यात फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली सध्या वाढली आहे. ऊन प्रचंड प्रमाणात वाढल्याने प्राणीसंग्रहालयातील विविध प्राण्यांच्या विभागात फॉगर लावण्यात आले आहेत. प्राणीसंग्रहालयातील विविध प्राण्यांची विशेष काळजी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घेतली जाते. दरवर्षी येथील प्राण्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात येत असतात. त्यात प्राण्यांना उन्हाच्या झळा लागू नयेत, म्हणून व्यवस्था केली जात असते. आता फॉगर लावण्यात आले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात उन्हाचा चटका प्राण्यांना लागणार नाही. ते त्यांच्या खंदकात मोकळेपणाने वावरू शकतील.
नुकतेच पुन्हा सुरू झाले प्राणीसंग्रहालय
20 मार्चपासून राजीव गांधी प्राणीसंग्रहालय (Rajiv Gandhi Zoological Park & Wildlife Research, Katraj) पर्यटकांसाठी सुरू झाले आहे. 2 वर्ष 5 दिवसांनी अखेर प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी (Tourist) खुले झाले. दोन डोस घेतलेले असतील तरच सध्या प्रवेश दिला जात आहे. मागील अनेक महिन्यांपासून पर्यटक याची वाट पाहत होते. आता पर्यटकांची प्रतीक्षा संपली, पर्यटकही मोठ्या प्रमाणात इथे भेट देत आहेत. पाहा प्राण्यांच्या फॉगरचा व्हिडिओ –
नवे प्राणी, नवे खंदक, नव्या सुविधा
नवे प्राणी, त्यांच्यासाठी नवे खंदक तसेच इतर सुविधांनी युक्त विशेषत: सध्याचा उन्हाळा लक्षात घेता सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. प्राण्यांसह पर्यटकांनाही नवा अनुभव यानिमित्ताने मिळत आहे.