Food trucks : नियमांचं उल्लंघन करतायत 90%पेक्षा जास्त फूड ट्रक्स, तपासणीसाठी पुणे आरटीओची आता विशेष मोहीम

अंदाजे सरासरी 150-200 ट्रक शहराच्या आसपास आहेत. नेमका आकडा आम्हाला माहीत नाही. त्यांना ओळखणे आणि ते नियमांचे पालन करत आहेत का ते तपासणे हे आमच्या ड्राइव्हचे उद्दिष्ट आहे.

Food trucks : नियमांचं उल्लंघन करतायत 90%पेक्षा जास्त फूड ट्रक्स, तपासणीसाठी पुणे आरटीओची आता विशेष मोहीम
फूड ट्रक, संग्रहित छायाचित्रImage Credit source: Homegrown
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 7:30 AM

पुणे : शहरात कार्यरत असलेल्या 90% पेक्षा जास्त फूड ट्रक पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (Regional Transport Office) नोंदणीकृत नाहीत, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. आता त्यांची तपासणी करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती आरटीओकडून देण्यात आली आहे. सध्या आमच्याकडे जेमतेम सात फूड ट्रक नोंदणीकृत आहेत. अशा ट्रकच्या चालकांनी काही मूलभूत आणि महत्त्वाचे नियम पाळले पाहिजेत. त्यांना पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) आणि पुणे वाहतूक पोलीस या दोघांचीही परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच, फूड ट्रक्सना फक्त खाद्यपदार्थ देण्याची (allowed to serve food) आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ ते त्यांच्या वाहनांमध्ये तयार करू शकत नाही, अशी माहिती पुण्याच्या परिवहन अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली आहे.

सरासरी 150-200 ट्रक

अंदाजे सरासरी 150-200 ट्रक शहराच्या आसपास आहेत. नेमका आकडा आम्हाला माहीत नाही. त्यांना ओळखणे आणि ते नियमांचे पालन करत आहेत का ते तपासणे हे आमच्या ड्राइव्हचे उद्दिष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्यांना नियमांची माहिती आहे की नाही हे देखील आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे आरटीओ अधिकाऱ्याने सांगितले. पीएमसी आणि वाहतूक पोलिसांच्या मंजुरीनंतरच या वाहनांची फूड ट्रक म्हणून नोंदणी केली जाते, असेही सांगण्यात आले आहे.

वाहनांमध्ये स्वयंपाक करण्यास मनाई

नियमांनुसार, त्यांची व्यावसायिक वाहने आणि फूड ट्रक म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. खासगी ट्रकला फूड ट्रकमध्ये बदलून चालवता येत नाही. काही ठिकाणी असे होत असल्याचा माहितीही आरटीओला मिळाली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव, वाहनांमध्ये स्वयंपाक करण्यास मनाई आहे. कारण एलपीजी सिलिंडर वापरणे आवश्यक आहे आणि यामध्ये नेहमीच धोका असतो.

हे सुद्धा वाचा

वाहतुकीला अडथळा नको

रहदारीला अडथळा येवू नये, अशा ठिकाणी हे ट्रक उभे करणे आवश्यक आहे, म्हणूनच वाहतूक पोलिसांची परवानगी आवश्यक असते. जर त्यांनी या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असतील, तर आरटीओ त्यांना मंजुरी देते करते, असे आरटीओ अधिकाऱ्याने निदर्शनास आणून दिले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.