पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनचोरीच्या घटना सातत्याने घडत असतात. अश्यातच एक दोन नव्हे तर तब्बल 51 वाहनांच्या चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. टाका केलेलया आरोपीकडून एकूण 36 लाख किंमतीच्या 51 दुचाकी जपत केल्या आहेत. शंकर भिमराव जगले (वय 20रा. हारगुडे वस्ती, चिखली), संतोष शिवराम घारे (वय 39, रा. ओझर्डे, ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
यामधील आरोपी संतोष शिवराम घारे हा वयाच्या 17 वर्षापासून वाहनचोरी करत आहे. चोरी केवळ ऐषोरामा
करण्यासाठी चोरी करत असल्याची धक्कदायक माहिती पोलीस तपासाच्या दरम्यान पुढे आहेत. त्याच्यावर आतापर्यंत 200 गुन्हे दाखल आहेत. आरोपीवर पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, नगर, नाशिक येथून वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. शंकर जगले हा घरफोडीच्या गुन्ह्यात फरार होता. त्याच्यावर वाहनचोरी, मोबाईल चोरी, घरफोडी, दरोड्याचा प्रयत्न असे सात गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, फौजदार मंगेश भांगे यांच्या पथकाने केली.
पोलिसांनी असा घेतला शोध
तळेगाव – दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीचे सर्वाधिक गुन्हे घडल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यावरूनच फौजदार मंगेश भांगे यांनी सुमारे 450 हून अधिक सीसीटीव्ही तपासून वाहन चोरांचा शोध घेतला. त्यातून या आरोपींची माहिती मिळाली. त्यातील दोनजण पवना हॉस्पिटल या ठिकाणी येत असून ते या भागातील नसल्याची माहिती भांगे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपीं दुचाकीवरुन पळून गेले. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन उर्से गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता दुचाकी चोरीची कबुली दिली. आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याने त्यांची वेळेवेळी पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली. त्यावेळी त्यांनी चोरलेल्या दुचाकीबाबत माहिती दिली.
हे ही वाचा:
पक्ष वेगळे भावना सारखी, सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटलांच्या मुलाची अपघातग्रस्तांना एकत्र मदत
राज्यातील गंभीर समस्यांकडे जनतेचे दुर्लक्ष होण्यासाठी समीर वानखेडेंवर टीका, चंद्रकांत पाटलांचा आरोप