AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhav Godbole passed away : निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचं निधन; पुण्यातल्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

डॉ. माधव गोडबोले हे भारतीय प्रशासकीय अधिकारी (निवृत्त) होते. त्यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाचे अर्थशास्त्र (Economics) या विषयात एम. ए. व पीएच्‌.डी. या पदव्या प्राप्त केल्या. 1959 साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला होता.

Madhav Godbole passed away : निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचं निधन; पुण्यातल्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचं निधनImage Credit source: ANI
| Updated on: Apr 25, 2022 | 12:24 PM
Share

पुणे : निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले (Madhav Godbole) यांचे निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. हृदयक्रिया बंद झाल्याने (Cardiac failure) त्यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुजाता, मुलगा राहुल, मुलगी मीरा, सून दक्षिणा, जावई महेश आणि नातवंडे आदिती, मनन, गायत्री आणि तारिणी असा परिवार आहे. डॉ. माधव गोडबोले हे भारतीय प्रशासकीय अधिकारी (निवृत्त) होते. त्यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाचे अर्थशास्त्र (Economics) या विषयात एम. ए. व पीएच्‌.डी. या पदव्या प्राप्त केल्या. 1959 साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला व मार्च 1993मध्ये भारताच्या केंद्र सरकारचे गृहसचिव व न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव व नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून कामे केली होती.

विविध समित्यांचे अध्यक्ष

माधव गोडबोले यांनी महाराष्ट्र राज्याच्या शासनात मुख्य वित्तसचिव म्हणून काम केले होते. गोडबोले हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्ष होते. याशिवाय, त्यांनी मनिला येथील आशियाई विकास बँकेत पाच वर्षे काम केले. सेवानिवृत्तीनंतर गोडबोले यांनी विविध समित्यांचेदेखील काम पाहिले.

पुस्तकांचे लेखन

माधव गोडबोले लेखकही होते. ऑक्टोबर 2019पर्यंत माधवराव गोडबोले यांनी 15 इंग्रजी आणि 10 मराठी पुस्तके लिहिली. ‘चांगले प्रशासन हा मूलभूत हक्क मानला जावा’ यासाठी त्यांनी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आधारित A Quest For Good Governance (2004) या पुस्तिकेचे ते सहलेखकही आहेत. त्यांचे The Judiciary and Governnace in India हे पुस्तक जानेवारी 2009मध्ये प्रकाशित झाले व त्यानंतर India’s Parliamentary Democracy on Trial हे पुस्तक 2011 साली प्रसिद्ध झाले.

विविध पुरस्काराने सन्मानित

माधव गोडबोले यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेची 2000 व 2004 सालची पारितोषिके – दोन मराठी लेखसंग्रहांना वैचारिक लेखनासाठी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 2016चा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार, ‘द फर्ग्युसनोनियन’ या फर्ग्युसन कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेकडून फर्ग्युसन गौरव पुरस्कार (29 मे 2017) यासह विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.

आणखी वाचा :

Pune Wrestling competition : ओमकार येलभर आणि कोमल शितोळे ‘मल्लसम्राट’; पुण्यातील शिरूरमध्ये उत्साहात झाली कुस्ती स्पर्धा

Pune BJP : लोडशेडिंग आणि सक्तीची वीजवसुली थांबवा, पुण्यातल्या उंड्रीत भाजपाचं राज्य सरकारविरोधात ‘कंदील’ आंदोलन

20 किमीसाठी 80 किमीची टोलवसुली थांबवा, अन्यथा…; पुण्याच्या खेड-शिवापूर टोलनाक्याविरोधात कृती समितीनं काय इशारा दिला, वाचा…

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.