Pune crime | पुण्यातील येरवडा स्लब दुर्घटनेत अटक केलेल्या चौघांना14 दिवसांची पोलीस कोठडी
घटनेच्या वेळी कामगार काम करत असताना अचानक ही जाळी कोसळली. या लोखंडाच्या जाळी खाली कामगार दबले गेले, त्यात त्यांना मार लागला व मृत्यू झाला.काहीजण गंभीर जखमी झाले.
पुणे – शहरातील येरवडामधील शास्त्रीनगर परिसरात मॉलच्या (Yerawada slab accident) बांधकामाची लोखंडी जाळी पडून 5 कामगारांचा मृत्यू प्रकरणी अटक केलेल्या चार जणांना 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत (police custody) ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत. या जागा मालक आणि ब्लु ग्रास बिझनेस पार्कचे लायझनिंग काम पाहणारी लॅंडवाईज प्रा.लि. आणि कन्स्ट्रक्शनचे काम पाहणारे मे. अहलुवालिया कन्स्ट्रक्शन इंडिया लि. यांचा एकमेकांशी झालेल्या कराराबाबत कागदपत्रे प्राप्त करायची असल्याचे सांगत आणखी कोणाचा गुन्ह्यात सहभाग आहे का? याच्या शोधासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील योगेश कदम (yogesh kadam) यांनी केली.
अशी घडली घटना
येरवड्यातील नगर रस्त्यावर शास्त्रीनगर चौक परिसरात वाडिया यांच्या जागेत वरदे हाईट्स शेजारी ब्लु ग्रास बिझनेस पार्क या इमारतीच्या टॉवर बीच्या नवीन इमारत बांधकाम सुरू आहे. घटनेच्या दिवशी या घटनेचा पाया खोदला जात आहे. बेसमेंटला स्लॅब टाकण्याची तयारी केली होती. स्लॅब टाकण्यासाठी लोखंडी जाळीचे भले मोठेकडे करण्यात आले होते. घटनेच्या वेळी कामगार काम करत असताना अचानक ही जाळी कोसळली. या लोखंडाच्या जाळी खाली कामगार दबले गेले, त्यात त्यांना मार लागला व मृत्यू झाला.काहीजण गंभीर जखमी झाले. या घटनेतील आरोपी प्रोजेक्टचा सिनिअर सेफ्टी सुपरवायझर इमतियाज अबुल बरकात अन्सारी ( वय 38, रा. बिहार), लेबर कॉक्ट्रक्टर सुपरवायझर मोहम्मद शरीफ हबीबूल रहेमान आलम (वय 35, रा. बिहार), प्रोजक्ट मॅनेजर असिस्टंट विजय एकनाथ धाकतोडे (वय 25, रा. शिक्रापूर) व प्रोजक्ट मॅनेजर मजीद अलीसा खान ( वय 45, रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
सक्त कारवाई करण्याचे निर्देश
या घटनेतील दोषींवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. या घटनेतील मृतांच्या कटुंबीयांना पाच लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे. या घटनेच्या तापासासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापनाही करण्यात आली आहे.
Lata Mangeshkar : मुंबईतील या मार्गाने निघणार लतादिदींची अंत्ययात्रा, पंतप्रधान मोदी मुंबईत येणार
लोखंडी तारांच्या कुंपणावरून कसा चपळाईनं पळतोय बिबट्या? पाहा Leopard Viral Video