Pune crime : लिफ्ट बसवण्यासाठी ऑनलाइन कोटेशन मागवून फसवायचा; बंडगार्डन पोलिसांनी दाखवला हिसका

आरोपी शहाने डेंटल टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केला आहे. मुंबईत कृत्रिम दात तयार करणार्‍या कंपनीत तो नोकरी करत होता. मात्र, काही दिवसानंतर त्याने ही नोकरी सोडून डॉक्टर असल्याची बतावणी करत लिफ्ट आणि मार्बल व्यवसायिकांना आर्थिक गंडा घालण्यास सुरूवात केली.

Pune crime : लिफ्ट बसवण्यासाठी ऑनलाइन कोटेशन मागवून फसवायचा; बंडगार्डन पोलिसांनी दाखवला हिसका
ठेकेदाराचे अपहरण करत खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 4:23 PM

पुणे : लिफ्ट आणि मार्बल व्यवसायिकांना गंडा घालणार्‍या एका तोतया डॉक्टरला बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden police) अटक केली आहे. तेजस अशोक शहा (वय 37, रा. कारेगाव, ता. शिरूर ) असे या तोतया डॉक्टरचे नाव आहे. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, झारखंड आणि इतर राज्यातील 50 ते 60 व्यवसायिकांची त्याने फसवणूक (Cheat) केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शहा याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अशाप्रकारचे 9 गुन्हे दाखल आहेत. हॉस्पिटलमध्ये लिफ्ट बसविण्यासाठी ऑनलाइन कोटेशन (Online quotations) मागवून त्यानंतर टेंडर पास झाल्याचे सांगत टेंडर फी आणि टेंडरसाठीची ई. एम. डी (अर्न मनी डिपॉझिट) रक्कम बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेत तो फसवणूक करत होता. डेंटल टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केलेल्या शहाने नोकरी सोडून फसवणुकीचा धंदा सुरू केला होता.

प्रकरण काय?

टिंगरेनगर येथील एका व्यवसायिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात यासंबंधी फिर्याद दिली होती. फिर्यादींचा लिफ्ट बसविण्याचा व्यवसाय आहे. शहा याने त्यांना फोन केला होता. आपण तळेगाव येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथून बोलत असल्याचे त्याने सांगितले. हॉस्पिटलमध्ये लिफ्ट बसवायची असल्याचे शहा याने फिर्यादला सांगितले. त्यानंतर हॉस्पिटलच्या मेलवर लिफ्ट बसविण्यासाठीचे कोटेशन त्याने मागवून घेतले. काही दिवसांनी परत त्यांना फोन करून तुमचे टेंडर पास झाले आहे. टेंडरची फी आणि ई.एम.डी रक्कम असे 56 हजार 400 रुपये एका बँक खात्यावर मागवून घेतले.

फिर्यादीने गाठले पोलीस स्टेशन

पैसे तर घेतले, मात्र त्यानंतरदेखील लिफ्ट बसविण्याचे काम दिले नाही. त्यामुळे फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी पैसे ट्रान्सफर झालेले खाते, ई-मेल, मोबाइल नंबरच्या तांत्रिक तपासावरून आरोपी शहा याला कारेगाव परिसरातील बाभूळसर येथून ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा

आरोपीची पार्श्वभूमी काय?

आरोपी शहाने डेंटल टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केला आहे. मुंबईत कृत्रिम दात तयार करणार्‍या कंपनीत तो नोकरी करत होता. मात्र, काही दिवसानंतर त्याने ही नोकरी सोडून डॉक्टर असल्याची बतावणी करत लिफ्ट आणि मार्बल व्यवसायिकांना आर्थिक गंडा घालण्यास सुरूवात केली. आता त्याचे पितळ उघडे पडले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.