Pune crime : भर चौकात तरुणांची फ्रीस्टाइल! पुण्यातल्या अलका चौकातला व्हिडिओ व्हायरल; सात जणांना अटक

घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलिसांनी दखल घेत यातील गुन्हेगार तरुणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले तरूण हे सिंहगड रोड परिसरातून आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Pune crime : भर चौकात तरुणांची फ्रीस्टाइल! पुण्यातल्या अलका चौकातला व्हिडिओ व्हायरल; सात जणांना अटक
तरुणाची अलका चौकात हाणामारीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 8:38 PM

पुणे : पुण्यातील अलका चौकात तरुणांनी आज हैदोस घातला. दोन गटात तुफान हाणामारी (Fighting) झाली. एकाने तर दगड उचलून डोक्यात मारण्याचीही तयारी केली होती. मात्र मध्यस्थांनी बाजूला करत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. यानिमित्ताने पुण्यातील गुन्हेगारीवर (Pune crime) कोणाचा वचक राहिला आहे की नाही, असा सवाल विचारला जात आहे. या संपूर्ण हाणामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. टिळक रोडवरील जोंधळे चौकात तरुणांची ही फ्री स्टाइल हाणामारी पाहायला मिळाली आहे. जवळपास 10 ते 12 तरुणांकडून एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आल्याचे व्हिडिओत (Video viral) दिसत आहे. टोळक्यातील एकाने भला मोठा दगड घेऊन डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे भररस्त्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या टोळक्याकडून करण्यात आला आहे.

हाणामारीचे कारण अस्पष्ट

या हाणामारीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दहा-बारा तरूण दिसत आहेत. ते एका तरुणाला बेदम मारहाण करीत आहेत, असे दिसत आहे. या घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हेगारांना अटक केली आहे. एकूण सात जणांवर कारवाई करण्यात आल्याचे विश्रामबाग पोलिसांनी सांगितले असून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून हा हाणामारीचा प्रकार झाल्याचे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

व्हायरल झालेला व्हिडिओ

भर चौकातला प्रकार

घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलिसांनी दखल घेत यातील गुन्हेगार तरुणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले तरूण हे सिंहगड रोड परिसरातून आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. भर चौकात हे भांडण सुरू होते. यावेळी वाहनचालकांना अडथळा निर्माण झाला होता. भांडण सुरू असताना एक तरुणीही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ती नेमकी कोण आहे, हे समजू शकले नाही. ती या भांडणात मध्यस्थी करत असल्याचे दिसत आहे. तसेच कोणासोबत तरी मोबाइलवर बोलत असल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून अजून यात कोण सहभागी आहे, याचाही तपास केला जाणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.