Pune crime : गंभीर गुन्हे दाखल असलेला फरार गुन्हेगार अन् एम. के. कंपनीचा म्होरक्या अखेर हवेली पोलिसांना शरण

हवेली आणि सासवड पोलीस ठाणे, ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, शहर गुन्हे शाखा, एटीएसचे पथक या सर्वांनीच मंगेश कदमला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र मोबाइलचा वापर तो करत नव्हता त्याचबरोबर राहण्याचे ठिकाणही सतत बदलत होता.

Pune crime : गंभीर गुन्हे दाखल असलेला फरार गुन्हेगार अन् एम. के. कंपनीचा म्होरक्या अखेर हवेली पोलिसांना शरण
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 9:49 AM

पुणे : गंभीर गुन्हे दाखल असलेला फरार गुन्हेगार अखेर पोलिसांना शरण (Surrender to the police) आला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमवून दहशत निर्माण करणे, मारामारी, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल असलेला मंगेश उर्फ भाईजी कदम पोलिसांना शरण आला आहे. तो फरार होता. एम. के. कंपनीचा म्होरक्या मंगेश उर्फ भाईजी कदम (Mangesh aka Bhaiji Kadam) हवेली पोलिसांना शरण आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून तो फरार होता. धायरी येथील कुख्यात गुन्हेगार हसन शेख याचा सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून केल्याचा आरोप मंगेश कदमच्या टोळीवर आहे. त्या गुन्ह्यात मोक्कांतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. त्यानंतर जवळपास तीन वर्षांपासून कदम फरार होता. हवेली व सासवड पोलीस स्टेशन, ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, शहर गुन्हे शाखा, एटीएस पथक अशा सर्वांकडून त्याचा शोध सुरू होता. बुधवारी रात्री उशिरा तो स्वतःहून हवेली पोलिसांकडे (Haveli police station) हजर झाला आहे.

…म्हणून शोधण्यास येत होत्या अडचणी

हवेली आणि सासवड पोलीस ठाणे, ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, शहर गुन्हे शाखा, एटीएसचे पथक या सर्वांनीच मंगेश कदमला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र मोबाइलचा वापर तो करत नव्हता त्याचबरोबर राहण्याचे ठिकाणही सतत बदलत होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या. तो कोणाच्याही हाती लागत नव्हता. अखेर हवेली पोलिसांना मंगेश कदम (रा. माऊली अपार्टमेंट, धायरी, मूळ रा. नांदोशी, ता. हवेली) शरण आला आहे.

हे सुद्धा वाचा

खंडणीचा गुन्हा

खडकवासला येथील एका व्यावसायिकाला वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून त्याने खंडणी मागितल्याचा गुन्हा हवेली पोलीस ठाण्यात दाखल आहे. प्रभारी अधिकारी तेगबीरसिंह संधू यांनी मंगेश कदमच्या संपर्कात असणाऱ्या हद्दीतील काहीजणांची माहिती काढली, त्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे वाढता दबाव पाहता तो स्वत:च पोलिसांना शरण आला. तेगबिरसिंह संधू यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस हवालदार दिनेश कोळेकर, निलेश राणे, विलास प्रधान, रामदास बाबर, पोलीस नाईक राजेंद्र मुंढे, कॉन्स्टेबल स्वप्नाली कोलते यांच्या पथकाने मंगेश कदमला ताब्यात घेण्याची कारवाई केली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.