Video : पुणे पोलीस आयुक्तालयात गजा मारणे, बाबा बोडके, घायवळसह तीनशे गुन्हेगारांची हजेरी, नेमकं काय कारण

पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून शहरातील रेकॉर्डवरील सर्व नामचिन कुख्यात गुंडांसह सराईत गुन्हेगारांंना पोलीस आयुक्तालयात बोलावलं आहे. या सर्व गुंडांना एकत्र बोलवण्याचं नेमकं काय कारण? कुख्यात गुंड नेमके कोण? जाणून घ्या.

Video : पुणे पोलीस आयुक्तालयात गजा मारणे, बाबा बोडके, घायवळसह तीनशे गुन्हेगारांची हजेरी, नेमकं काय कारण
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 5:12 PM

पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या खूनांमुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण आहे. शरद मोहोळ याची महिन्याआधी भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे टोळीयुद्धाचा भडका उडण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र त्याआधी नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील टोळ्यांच्या प्रमुख म्होरक्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करत करण्यात आलं आहे. गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांसह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलीस मुख्यालयात हजेरी लावली आहे. रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची आज ओळख परेड करण्यात आलीये. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यावेळी उपस्थित होते.

पाहा व्हिडीओ

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी जवळपास दोनशे ते तीनशे गन्हेगारांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये हजर करण्यात आलं आहे. आगामी निवडणुकीच्या आधी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आयुक्तांनी सर्व अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड केली. पुणे शहरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारांवर ज्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे त्यांना सर्वांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आलंय.

पुणे शहरातील कायम चर्चेत असलेले गजानन मारणे, बाबा बोडके, जंगल्या सातपुते आणि निलेश घायवळ हे मोठे गुन्हेगार उपस्थित होते. यामधील काही गुन्हेगार हे जामिनावर बाहेर आहेत तर काही प्रकरणांची चौकशी सुरू आहे अशा सर्वांना उपस्थित राहण्यासाठी सांगितलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा वापर करू नये, अशा सूचना पोलिसांनी या गुंडांना दिल्या गेल्या आहेत.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.