गजा मारणेची मिरवणूक काढणाऱ्या आठ जणांना अटक; भाजप पदाधिकाऱ्याचा समावेश

गजा मारणेला तुरुंगातून आणण्यासाठी जी लँड क्रुझर कार वापरण्यात आली होती, ती राहुल दळवी यांनी आणली होती. राहुल दळवी हे वडगाव शेरीतील भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत.

गजा मारणेची मिरवणूक काढणाऱ्या आठ जणांना अटक; भाजप पदाधिकाऱ्याचा समावेश
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 8:34 AM

पुणे: कुख्यात गुंड गजा मारणेच्या (Gaja Marne) मिरवणुकीसाठी आलिशान वाहन पुरविणाऱ्या भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासह आठ जणांना कोथरुड पोलिसांनी केली अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी सहा अलिशान कारही जप्त केल्या. (Gangster Gaja Marne procession pune police arrest 8 peoples)

गजा मारणेला तुरुंगातून आणण्यासाठी जी लँड क्रुझर कार वापरण्यात आली होती, ती राहुल दळवी यांनी आणली होती. राहुल दळवी हे वडगाव शेरीतील भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत. त्याने वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नारायण गलांडे यांच्याकडून कामासाठी त्यांची कार घेतली होती. हे प्रकरण तापल्यानंतर राहुल दळवी गायब झाला होता. मात्र, आता पुणे पोलिसांनी राहुल दळवीसह आठ जणांना अटक केली आहे.

गजा मारणे फरार

या सगळ्या प्रकरणानंतर गजा मारणे फरार झाला आहे. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी गजानन मारणे फरार असल्याची माहिती देण्यात आली होती. मारणेच्या शोधासाठी वारजे पोलिसांनी स्वतंत्र पथकं नेमली आहेत.

संबंधित पोलीस पथकांनी मारणेसह त्याच्या साथीदारांच्या घरांसह लपण्याच्या विविध ठिकाणी अचानक छापेमारी सुरु केली आहे. आरोपींना लपण्यास मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मारणेच्या संपत्तीची आणि बँक खात्यांची माहितीही गोळा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे निश्चित मुदतीत गजानान मारणे सापडला नाही तर त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई देखील सुरु करण्यात येणार आहे.

ती लँडक्रुझर कार होणार जप्त?

गजा मारणे ज्या गाडीत बसून तळोजा कारागृहातून बाहेर पडला ती लँडक्रुझर कार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत नारायण गलांडे यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची होती. या गाडीची सध्याची किंमत जवळपास दोन कोटी रुपये इतकी आहे. पुण्यात हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांकडेच ही कार आहे.

गजा मारणेच्या मिरवणुकीनंतर आता ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे लँडक्रुझर कार गुंडाला देणे नारायण गलांडे यांना भलतेच महागात पडले, अशी चर्चा सुरु आहे.

नेमकं काय घडलं होतं?

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते.

हेही वाचा :

गजानन मारणेपाठोपाठ आता शरद मोहोळविरोधातही गुन्हा दाखल

VIDEO| गजा मारणेची तळोजा कारागृहातून मुक्तता; मारणे टोळीचा मिरवणूक काढून जल्लोष

VIDEO | गुंड गजानन मारणेच्या साथीदारांचा एक्स्प्रेस वेवर हलकल्लोळ, पोलिसांनी ड्रोन जप्त करताच पळापळ

(Gangster Gaja Marne procession pune police arrest 8 peoples)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.