Fake purchase orders| बनावट खरेदी ऑर्डर्स दाखवत जर्मन कंपनीला लावला139 कोटींना चुना ;चाकणमधील तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा प्रताप
वेगवेगळ्या व्हेंडरकडून खोटे इनव्हाइस घेऊन, कोणताही माल कंपनीत न आणता बिलाची रक्कम सर्व व्हेन्डरला कंपनीच्या बॅंक खात्यामधून दिली. मात्र याबाबत कंपनीतील वरिष्ठ व इतर कोणालाही याबाबत माहिती दिली नाही. याच गैरव्यवहारांतून मिळालेली रक्कम विविध प्रकारे आपल्यानातेवाईकांच्या नावाने वळवली.
पिंपरी – पिंपरी चिंचवडमधील ( Pimpri Chinchwad)चाकण परिसरातील एचयुएफ इंडिया प्रा. लि. कंपनीत 139 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बनावट खरेदी ऑर्डर्स काढून कंपनीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. कंपनीत उच्चपदावर कार्यरत असलेल्या तीन अधिकाऱ्यांनी हा घोटाळा (Scam)केला आहे या प्रकरणात पोलिसांनी विशाल विनयकुमार टमोटिया (वय 45, मोशी), निखील नरेंद्रकुमार आगरवाल (वय 45, वाकड), संदीप राधाकृष्ण वाणी (वय 56, चिंचवड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह सुनील कुमार गर्ग याच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा प्रकार 2010 ते मे 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. एचयूएफ कंपनीचे संचालक असलेले संदीप जगदीश चौधरी (वय 45, रा. नानेकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस(Chakan Police) ठाण्यात फिर्याद दिली.
तर झाल असं की
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एचयूएफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील गर्ग, फायनान्स हेड निखील अगरवाल, ऑपरेशन्समधील संदीप वाणी व आयटी हेड विशाल टमोटीया यांनी पदाचा गैरवापर केला. त्यानी संगनमताने खोट्या परचेस ऑर्डस्र् सीरीज तयार केल्या.त्याद्वारे वेगवेगळ्या व्हेंडरकडून खोटे इनव्हाइस घेऊन, कोणताही माल कंपनीत न आणता बिलाची रक्कम सर्व व्हेन्डरला कंपनीच्या बॅंक खात्यामधून दिली. मात्र याबाबत कंपनीतील वरिष्ठ व इतर कोणालाही याबाबत माहिती दिली नाही. याच गैरव्यवहारांतून मिळालेली रक्कम विविध प्रकारे आपल्यानातेवाईकांच्या नावाने वळवली.
असा उघड झाला घोटाळा
एचयूएफ ही जर्मन स्थित कंपनी आहे. या कंपनीत विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स पार्टचे उत्पादन केले जाते. या गैरव्यवहाराचामाहिती मिळाल्यानंतर कंपनीच्या विद्यमान संचालकांनी कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट केले. त्यातून गैरव्यवहाराचा प्रकार समोर आला. त्यानुसार अपहार प्रकरणी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने केला. आतापर्यंत आरोपी विशाल टमोटिया, निखील आगरवाल, संदीप वाणी यांच्याकडून 17 लाख 74 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
Wardha Crime | कैदेतून सुटीवर आले नि पसार झाले, 14 वर्षांनंतर फरार दोन गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात