पुणे महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार : खा. बापट

पुण्यात भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार किंबहुना येतील, अशी भविष्यवाणी भाजप खासदार गिरीश बापट यांनी केली.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार : खा. बापट
गिरीश बापट
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 6:50 AM

पुणे : पुण्यात भाजपचे नगरसेवक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. भाजपच्या सत्ताकाळात पुण्यात विकास होत आहे. त्यामुळे येत्या 2022 च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा घौडदौड करेल. भाजपने लोकांना दिलेला विकासाचा शब्द पाळला असल्याने पुण्यात भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार किंबहुना येतील, अशी भविष्यवाणी भाजप खासदार गिरीश बापट यांनी केली. (Girish Bapat Press Conference over Pune mahapakika Election)

पुणे महापालिकेची निवडणूक 2022 ला होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आतापासून तयारीला लागलेले दिसत आहे. पुणे शहर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत त्यांच्याकडून विविध विकासकामांची, उभा राहिलेल्या प्रकल्पांची तसंच अर्धवट अवस्थेत असलेल्या प्रकल्पांची माहिती बापट यांनी घेतली. या बैठकीला खा. बापट, पुणे शहर भाजपाध्यक्ष जगदिश मुळिक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे आदी नेते उपस्थित होते.

“केंद्र सरकारने पुणे शहराला गेल्या 4 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलंय. केंद्राच्या अनेक योजना शहरात सुरु आहे. तसंच तत्कालिन फडणवीस सरकारने देखील पुण्याला मोठ्या प्रमाणावर निधी दिला, असं सांगताना महाविकास आघाडीने मात्र अजिबातच निधी पुणे शहराला दिला नाही”, अशी टीका बापट यांनी केली.

“संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आलं. पुण्यातही कोरोनाने रौद्र रुप धारण केलं होतं. परंतु अशाही परिस्थितीत पुण्याचे महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या संपूर्ण नगरसेवकांच्या टीमने अतिशय उत्तम काम केलं. पुणेकरांची काळजी घेणारा महापौर लाभला, अशी स्तुती बापट यांनी केली. भाजपच्या नगरसेवकांनी गेल्या काही वर्षात मोठं सामाजिक काम केलंय”, असंही बापट म्हणाले.

“पुणेकरांच्या हिताचे निर्णय भाजपने घेतले. कराच्या दंडात सवलत देऊन महापालिकेला उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न केला. 24 तास पाणी पुरवठा योजनेला गती देण्यात आली आहे. भामा आसखेड प्रकल्पातील शेतकऱ्यांचे पुनर्वसन केले. यासाठी महापालिकेने 200 कोटींचा निधी दिला आहे. कोरोना संकट व्यवस्थितपणे हाताळलं. एकंदरित पुणेकरांना दिलेला शब्द पाळल्याने पुढच्या निवडणुकीत 100 पेक्षा जास्त भाजप-आरपीआयचे नगरसेवक निवडणून येतील”, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला. (Girish Bapat Press Conference over Pune mahapakika Election)

हे ही वाचा

पुणे पालिकेवर काँग्रेसचा झेंडा कसा फडकणार? वाचा बैठकीत काय घडलं?

‘जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…!’, आठवलेंनी कविता करत उडवली ठाकरे सरकारची खिल्ली

देशातील सर्वात तरुण महापौर म्हणून आर्या राजेंद्रन यांनी घेतली शपथ, फडणवीसांनाही टाकलं मागे

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.