तिकडे काँगोत सोन्याचा डोंगर, इकडे पिंपरीत सोन्याच्या नाण्यांचा ढिग

काँगोत सोन्याचा डोंगर आढळला तर इकडे पिंपरी चिंचवडमध्ये सोन्याच्या नाण्यांचा ढिग तर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरात पुरातन वास्तू आढळल्या आहेत. Gold coin in Pimpari

तिकडे काँगोत सोन्याचा डोंगर, इकडे पिंपरीत सोन्याच्या नाण्यांचा ढिग
पिंपरीत सोन्याची नाणी आढळली
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 6:16 PM

मुंबई: काँगोत सोन्याचा डोंगर खोदण्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना ताजी आहे. पत्रकार अहमद अल्गोहबारी सोन्यानं भरलेला डोंगर पाहून काँगोच्या ग्रामस्थांना धक्का बसल्याचं ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केलेला. इकडे पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये इतिहासकालीन सोन्याची नाणी पोलिसांनी हस्तगत केलीत. तर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरात पुरातन वास्तू आढळून आल्या आहेत. (Gold Mountain found in Congo Gold coin found in Pimpri Chinchwad and Historical material found in Kolhapur)

आफ्रिकेच्या काँगोमध्ये ‘सोन्याचा डोंगर’ सापडला आहे. स्थानिक लोकांना या डोंगराची माहिती मिळताच हजारो ग्रामस्थांनी सोने लुटण्यासाठी धाव घेतलीय. डोंगरावर सोन्याच्या प्रचंड गर्दीनंतर खाणकाम करण्यास थोडक्यात बंदी घातली गेली. काँगो देशाच्या बर्‍याच भागात सोन्याचे अस्तित्व आहे. अशा परिस्थितीत तेथे सोन्याचे खाण असणे ही सामान्य बाब आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये सोन्याची नाणी हस्तगत

पिंपरी चिंचवड पोलिसांना इतिहास कालीन सोन्याची नाणी हस्तगत करण्यात यश आलंय. दोन किलो 350 ग्रॅमची तब्बल 216 सोन्याची नाणी आहेत. त्यावर राजा मोहंमद शाह यांची मुद्रा असून उर्दू आणि अरबी भाषा कोरलेली आहे. इसवी सन 1720 ते 1750 या कालखंडातील असल्याचा दावा पुरातत्व विभागाने केलाय. ही सर्व नाणी चार महिन्यांपूर्वी एका बांधकामाच्या खोदकामात आढळली होती. सद्दाम पठाणचे सासरे मुबारक शेख आणि मेव्हणा इरफान शेख या दोघांना ती आढळली. पण त्यांनी सद्दामच्या घरातच ठेवली. नंतर याची वाटणी करण्यावरून वाद झालं अन याची खबर पोलिसांना लागल्याने त्यांचं बिंग फुटलं. बाजार भावानुसार एका नाण्याची किंमत साठ ते सत्तर हजार रुपये असावी, मात्र याचं ऐतिहासिक महत्व पाहता त्यासाठी अनेकांनी मोठी किंमत मोजली असती. अशी माहिती पोलिसांनी दिली.

अंबाबाई मंदिर परिसरात उत्खननामध्ये जर्मन बनावटीची रिव्हॉल्वर

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या आवारात असलेल्या मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आलय.या कुंडाच्या उत्खनना दरम्यान देवी-देवतांच्या प्राचीन मुर्ती, तत्कालीन नाणी इतकंच नव्हे तर जर्मन मेड रिव्हॉल्वर आणि काडतूस देखील मिळून आली आहेत.गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या उत्खननात आतापर्यंत जवळपास 475 पुरातन वास्तू सापडल्या असून आणखीनही काही ऐतिहासिक वस्तु सापडू शकतात असा दावा देवस्थान समितीने केलाय.

सीसीटीव्हीच्या निंयत्रणाखाली काम सुरु

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरालाच्या आवारात घाटी दरवाजाला लागून मणकर्णिका कुंड असल्याची असल्याची नोंद इतिहासात सापडते.जवळपास 60 फूट खोल असलेल्या या कुंडात देवीच्या स्नानाचे तसच काही नैसर्गिक झऱ्याचे पाणी येत होते. मात्र काळाच्या ओघात पुरातन महत्त्व असलेल्या या कुंडाला कोंडाळ्यात स्वरूप आलं आणि त्यानंतर हा कुंड बुजवला गेला. यावर एक बगीचा आणि शौचालय सुद्धा बांधल गेलं होतं.अनेक संघटनांनी हा कुंड खुला करण्यासंदर्भात आंदोलन सुरु केली होती.ही मागणी लक्षात घेत महानगरपालिकेने जानेवारी 2020 ला ही जागा देवस्थानकडे हस्तांतरित केली. यानंतर जून 2020 पासून या कुंडाच्या उत्खननाचे काम सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आलय. उत्खननाला गती येईल तसा या कुंडाचा ऐतिहासिक ठेवा खुला होतोय.

या कुंडात पाच ओवऱ्या आणि पन्नास वीरगळ असल्याचं आता पर्यत च्या उत्खननातून स्पष्ट झालं आहे. कुंडाच्या चार बाजूचे शिवलिंग आणि सोळा ऐतिहासिक झरे आतापर्यंत खुले झालेत… इतकच नाही तर देवी-देवतांच्या प्राचीन मूर्ती, प्राचीन नाणी, सुरक्षित स्थितीत असलेला काचेचा कंदील,जर्मन बनावटीची रिव्हॉल्वर तसंच काडतूसदेखील मिळून आली आहेत. या सगळ्या वस्तू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने संग्रही ठेवल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव जाधव यांनी दिली.

मनकर्णिका कुंडात सापडलेल्या रिव्हॉल्वरबाबत उत्कंठा

मनकर्णिका कुंडाच्या उत्खननादरम्यान सापडलेल्या या ऐतिहासिक वस्तू तत्कालीन समाजजीवनाच प्रतिबिंब आहेत. प्राचीन काळात भाविकांनी श्रद्धेने टाकलेली नाणी, त्याचबरोबर इतर वस्तू बाबत लवकरच उलगडा होणार आहे. विशेषता इथे सापडलेल्या जर्मन मेड सहा इंची रिव्हॉल्वर आणि काडतुसाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झालीय. एकूणच कुंडाचा कचराकुंडी म्हणून वापर सुरू झाल्यानंतर गुन्हे लपवण्यासाठी ही हत्यारं कुंडात टाकली गेली असावीत असा अंदाज उमाकांत राणींगा, मंदिर अभ्यासक यांनी वर्तवला आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला अंबाबाई मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंड जवळपास साठ वर्षानंतर पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतेय. लवकरच उत्खननाचे काम पूर्ण होणार आहे.त्यानंतर हा कुंड कोल्हापूरच्या पुरातन वास्तू वैभवात आणखीन भर पाडेल.

संबंधित बातम्या

OMG! अचानक सोन्याचा डोंगर सापडला; लोकांची सोनं लुटण्यासाठी अलोट गर्दी, व्हिडीओ व्हायरल

Gold Price Today: 6 महिन्यांत सोने प्रतितोळा 9 हजार 462 रुपयांनी स्वस्त; भाव आणखी घसरणार

(Gold Mountain found in Congo Gold coin found in Pimpri Chinchwad and Historical material found in Kolhapur)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.