पुणे शहरात चालले तरी काय? दिवसभरात दोन वेळा गोळीबार

पुणे शहरात काही तासांमध्ये दोन वेळा गोळीबार झाला आहे. सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवर व वडगाव शेरी जवळील ब्रह्मा सनसिटी या ठिकाणी गोळीबार झाला आहे.

पुणे शहरात चालले तरी काय? दिवसभरात दोन वेळा गोळीबार
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 4:35 PM

पुणे : पुणे शहरात कोयता गँगने (koyta gang) धुमाकूळ घातला आहे. गुन्हेगारी मोडण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर (Crime News) कारवाई केली असली तरी गुन्हे कमी होत नाही. कोयता गँगवर मकोका लावणे, कोंबिंग ऑपरेशन राबवणे, दहशतवाद्यांची यादी करणे अशी कामे पोलीस करत आहेत. परंतु त्यानंतरही गुन्हेगारी कमी होत नाही. आता पुणे शहरात काही तासांमध्ये दोन वेळा गोळीबार झाला आहे. सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवर (Pune Crime) बांधकाम व्यावसायिकाने गोळीबार केला. त्यापुर्वी शेकोटी पेटवण्याच्या वादावरुन वडगाव शेरी जवळील ब्रह्मा सनसिटी या ठिकाणी घडली.

नेमके काय झाले

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर झालेल्या चॅटिंगवरून बांधकाम व्यावसायिक संतोष पवार व रमेश बद्रीनाथ राठोड या दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर संतोष पवार याने रमेश राठोडवर गोळीबार केला. या घटनेत रमेश यांच्या पायाला गोळी लागली. त्यांच्या पायाला जखम झाली आहे. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केले आहे. विशेष म्हणजे घटना घडली त्या ठिकाणांवरुन सिंहगड रोड पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. संतोष पवार यांच्याकडे परवाना असलेले पिस्तुल आहे. त्याच्या संरक्षणासाठी एक पोलिस कर्मचारी देखील असतो.

हे सुद्धा वाचा

सकाळी झाला गोळीबार

पुण्यात किरकोळ वादावरुन हल्ले वाढत आहे. त्यात अनेक जण सर्रास हवेत गोळीबार करत आहे. पुण्यातील वडगाव शेरी जवळील ब्रह्मा सनसिटीजवळ सकाळीच शेकोटी पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून हवेमध्ये गोळीबार झाला. सनिसिटीजवळ असणाऱ्या अर्नोल्ड स्कूलजवळ सागर गायकवाड, अक्षय खामकर, रोहित क्षत्रिय, रोहित जेधिया, सिद्धार्थ शिंदे हे शेकोटी करीत बसलेले होते. त्या ठिकाणी अमित सिंह आला. त्याच्यात आणि इतर तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची सुरू झाली. या वादातून अमित सिंह याची गाडी फोडण्यात आली. यामुळे चिडलेल्या अमितने हवेमध्ये गोळीबार केला. त्यानंतर या तरुणांनी अमितला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले.

१३ आरोपींना लावलाय मकोका

पोलिसांनी आता कोयता गँगमधील १३ जणांवर मकोका लावला आहेत. त्यात म्होरक्या समिर लियाकत पठाण याचा समावेश आहे. समिर लियाकत पठाण (वय-२६ हडपसर, पुणे), शोएब लियाकत पठाण (वय २०, हडपसर पुणे) , गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार, (वय २२ मांजरी, पुणे, प्रतिक ऊर्फ एस के हनुमत कांबळे (वय २० मांजरी, पुणे), गितेश दशरथ सोलनकर (वय २१ हडपसर पुणे), ऋतिक संतोष जाधव, (वय- १९ मांजरी, पुणे ), साई राजेंद्र कांबळे, (वय-२० मांजरी, पुणे), ऋषिकेश ऊर्फ सोन्या संजय पखाले (वय २४ मांजरी, पुणे) , ऋतिक सुनिल मांढरे, (वय २२ मांजरी रोड,हडपसर पुणे १० ), प्रतिक शिवकुमार सलगर, (वय १९ मांजरी, पुणे) तसेच इतर आरोपी अल्पवयीन आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.