कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी या संघटनेची स्थापना, गुणरत्न सदावर्तेंनी केली घोषणा
कष्टकऱ्यांचा पूर्ण विकास हे आमचं धैय आहे. प्रत्येकाला आपलं संघटन स्थापन करण्याचा अधिकार आहे. 85 टक्के कष्टकरी हे दत्ता सामंतांच्या काळातही एकत्र नव्हते. ते कष्टकरी जनसंघाच्या विचारासोबत एकत्र आलेत.
अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, 68 हजार लोकं एकत्र येऊन उभारलेलं हिंदुस्थानी विचाराचं हे पहिलं संघटन आहे. दत्तोपंत ठेंगडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू यांच्या विचारांचं हे संघटन आहे. आम्ही पहिल्या बोर्डाचं लोकार्पण केलंय. कष्टकऱ्यांचा पूर्ण विकास हे आमचं धैय आहे. प्रत्येकाला आपलं संघटन स्थापन करण्याचा अधिकार आहे. 85 टक्के कष्टकरी हे दत्ता सामंतांच्या काळातही एकत्र नव्हते. ते कष्टकरी जनसंघाच्या विचारासोबत एकत्र आलेत.
या संघटनेच्या अध्यक्ष या डॉ. जयश्री पाटील आहेत. कुलकर्णी हे सचिव आहेत. हे एका जाती-धर्माचं संघटन नाही. हे एका वर्गाचं संघटन नाही. हे समूहाचं संघटन आहे. 35 हजार मराठा समाजाचे कष्टकरी या संघटनेचे सदस्य आहेत. 95 टक्के ब्राम्हणसुद्धा या संघटनेचे सदस्य आहेत. तेली, तांबोडी, लिंगायत समाजाचे लोकंही या संघटनेत आहे. एकूण 85 टक्के लोकं या संघटनेशी जुळलेले आहेत.
उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार
सरकार आमची आहे. 118 कष्टकरी हे जेलमध्ये आहेत. हे खऱ्या अर्थानं क्रांतीवीर आहेत. यांच्यावर कोणत्याही पोलीस ठाण्यात यांच्यावर आरोपपत्र दाखल केले नाही. न्यायालयानं काग्नीजन्स घेतलेला नाही. विलीनीकरणाच्या संदर्भात न्यायालयानं आम्हाला मुभा दिली आहे. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. न्यायालयाकडं जाण्याअगोदर विनंती करणार आहोत.स्वच्छ, प्रामाणिक अधिकाऱ्यांना तुम्ही विचार करण्यासाठी सांगा, असं सांगणार आहोत.
डंके की, चोट पे विलीनीकरण मिळेल
विलीनीकरण मिळेल, डंके की, चोट पे विलीनीकरण मिळेल, असंही सदावर्ते ठामपणे म्हणाले. महिलांच्या शोषणाचा विषय आहे. रमाकांत गायकवाड यांचा उपद्रव सुरू आहे. हे गायकवाड अजित पवार यांच्या जवळचे आहेत. त्यांनासुद्धा काढून टाका, अशी मागणी आहे. या सर्व गोष्टी हळूहळू येतील. बाकी कष्टकऱ्यांच्या मेळाव्यात ठरेल, असंही सदावर्ते यांनी स्पष्ट केलं.