Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंनी पैसे घेतल्याचा स्वारगेटमधील एसटी कर्मचाऱ्याचा दावा, गोळा करायला कुणी सांगितले?

आजच कोर्टात गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याकडून पैसे गोळा केल्याचा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केला. त्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांनीही याबाबत मोठा खुलासा केला आहे. गुणरत्न सदावर्तें आणि जयश्री सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले अशी स्वारगेट आगारातील कर्मचाऱ्यांनी टीव्ही 9 मराठीला माहिती दिली आहे.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंनी पैसे घेतल्याचा स्वारगेटमधील एसटी कर्मचाऱ्याचा दावा, गोळा करायला कुणी सांगितले?
सदावर्तेंनी पैसे घेतल्याचा एसटी कर्मचाऱ्याचा दावाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 12:18 AM

मुंबई : आजच कोर्टात गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याकडून (St Worker Protest) पैसे गोळा केल्याचा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केला. त्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांनीही याबाबत मोठा खुलासा केला आहे. गुणरत्न सदावर्तें आणि जयश्री सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले अशी स्वारगेट आगारातील कर्मचाऱ्यांनी टीव्ही 9 मराठीला माहिती दिली आहे. पुण्यातून 1 लाख 10 हजार रुपये जमा केले. अजयकुमार गूजर यांनी पैसे जमा करायला सांगितलं होतं, असा कर्मचाऱ्यांनी गौप्यस्फोट केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयात फॉर्म भरून घेतले असेही सांगितले आहे. प्रत्येक कर्मचाकडून 540 रुपये घेतले, असा दावा या कर्मचऱ्यांनी केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेरील आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते अटकेत आहेत. दोन दिवसांची कोठडी संपल्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्यांना आणखी दोन दिवसांच्या कोठडीत धाडलं आहे.

टिव्ही 9 च्या प्रतिनिधीशी एसटी कर्मचाऱ्याचा संवाद

कोर्टात युक्तीवादावेळी पैशांचा मुद्दा

गेल्या अनेक दिवासांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आदोनात गुणरत्न सादवर्तेंचं नाव चर्चेत आहे. कोर्टात एसटी कर्मचाऱ्यांची बाजू गुणरत्न सदावर्ते यांनीच मांडली. मात्र सदावर्ते यांनी भाषण केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भडकल्या असल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका सध्या त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलीस तपासात आणखी काही महत्वपूर्ण बाबी समोर येण्याचीही शक्यता आहे.

मात्र दुपारी युक्तीवादावेळी गुणरत्न सादवर्ते यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून 550 रुपये घेतल्याचे उघड झालं आहे असा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला आहे. तर साक्षीदारांनीच तशी कबुली दिली आहे, असेही सांगण्यात आले, त्याप्रमाणे त्याने 1 कोटी 80 लाख रुपये त्याने जमा केले. हा पैसा कुठे गेला, याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे, त्यासाठी आम्ही सदावर्तेंची कोठडी कोर्टाकडे मागितली अशी माहिती घरत यांनी दिली होती.

पैशांचं केलं काय?

त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी एवढै पैसा कशासाठी गोळा केला, या पैशांचं केलं काय, हा पैसा वापरला कुठे, असे अनेक सवाल उपस्थित झाले आहे. नेत्यांच्याही यावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत यांनी आधीच सदावर्ते यांना भाजपने पोसलेला गुंडा म्हटलं आहे, त्यामुळे यावरून जोरदार राजकारणही पेटण्याची शक्यता आहे. यात आता एसटी कर्मचाऱ्यांचा हा दावा किती खरा ठरतोय हे चौकशी पूर्ण झाल्यानंतरच कळेल. सध्या तरी हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना दिलासा नाहीच, पोलीस कोठडीतील मुक्काम दोन दिवसाने वाढला

Gunratna Sadavarte : 1 कोटी 80 लाख रुपये कुठे गेले? सदावर्तेंनी एवढा पैसा का गोळा केला? कोर्टात घमासान

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, INS Vikrant प्रकरणात अडचणी वाढल्या

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.