दुचाकीवर १० सूर्यनमस्कार करणारा रायडर पाहिलात का?

गेल्या 12 वर्षापासून मोटार सायकल रायडिंग करून आतापर्यंत 300 हून अधिक मोटार सायकल रायडिंग शो भारतात केले आहेत. मोटार सायकल रायडिंग करणे हा स्वत:पुरता मर्यादित राहिलेला नाही.

दुचाकीवर १० सूर्यनमस्कार करणारा रायडर पाहिलात का?
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 11:05 PM

बारामती : जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त (World Surya Namaskar) 14 जानेवारीला चालू मोटारसायकलवर 4 मिनिटे 20 सेकंदामध्ये सूर्यनमस्कार घातले म्हणून रोहित दिलीप शिंदे यांची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. मोटार सायकलवर 10 वेळा सूर्यनमस्कार काढणारा जगातील पहिला मोटार सायकल रायडर (Motorcycle Rider) आहे. तो वयाच्या 16 वर्षापासून मोटार सायकल रेस करीत आलेला आहे. गेल्या 12 वर्षापासून मोटार सायकल रायडिंग करून आतापर्यंत 300 हून अधिक मोटार सायकल रायडिंग शो भारतात केले आहेत. मोटार सायकल रायडिंग करणे हा स्वत:पुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याने अनेक इच्छुक युवकांना मोटार सायकल रायडिंगचे प्रशिक्षण (Riding Training) देण्यास सुरू केले आहे.

झारखंडमधील रायडिंगमध्ये प्रथम

मोटार सायकल स्टंटमध्ये मोटोक्रॉस, स्टंट रायडिंग ऑफ रोडिंग, ऍटोक्रॉस आणि रॅलीमध्ये उत्तुंग कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या झारखंडमधील रांची येथे मोटार सायकल रायडिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळवून नावलौकिक केला आहे. त्यामध्ये देशातील 70 रायडर्सनी भाग घेतला होता.

ग्लोबल हेडक्वॉर्टर स्पर्धेत भाग घेणार

केटीएम कंपनीच्या आरसी 390 सीसी गाडीवर रेस जिंकून चेन्नई येथे होणार्‍या ट्रॅक रेसिंग नॅशनल स्पर्धेसाठी रोहितची निवड झाली आहे. यामध्ये प्रथम दहामध्ये येणार्‍यास ऑस्ट्रिया केटीएम ग्लोबल हेडक्वॉटर स्पर्धेत भाग घेता येणार आहे, असे बजाज ऍटो लिमिटेडचे अध्यक्ष सुमित नारंग यांनी सांगितले.

हैद्राबादमध्ये प्रथम क्रमांक

मोटार सायकल रायडिंगमध्ये 2018 मध्ये रोहित महाराष्ट्रात पहिला व केरळमध्ये देशात तिसरा आला होता. 2019 मध्ये हैद्राबादमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. यापूर्वी तामिळनाडू कोईमतूरमध्ये झालेल्या मोटार सायकल रायडिंगमध्ये वेगवेगळ्या तीन स्पर्धेमध्ये रेकॉर्ड करून बारामतीतील रोहित दिलीप शिंदे यांनी देशात पहिला क्रमांक मिळविला होता.

सीआरएफ कंपनीने स्टंट वॉलफेअर राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये फ्री स्टाईल स्टंट रायडिंग ऑबस्टूकल टाइम चॅलेंज व लास्ट मॅन स्टँडिंग या तिन्ही स्पर्धामध्ये रोहितने अव्वलस्थान पटकाविले होते. मोटारसायकल एका चाकावर उचलून जास्तीत-जास्त गाडी गोल फिरविण्याची स्पर्धा होती. केवळ 8 मिनिटे 28 सेकंद एवढ्या कालावधीत तिन्ही स्पर्धेत रेकॉर्ड केले होते. तिन्ही स्पर्धेत एकत्रित रेकॉर्ड करणारा रोहित शिंदे हा स्टंट रायडिंगमध्ये पहिला खेळाडू ठरला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.