पुणे येथील महिलेच्या शरीरात धडधडले माजी सैनिकाचे ह्रदय

मध्य प्रदेशातील भिंड येथील माजी सैनिकाला रस्ते अपघात गंभीर दुखापत झाली. त्यांच्यांवर दिल्लीतील ’आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल’ सेंटरमध्ये उपचार सुरु होते. डॉक्टरांनी 11 फेब्रुवारी रोजी रुग्णाला ब्रेन डेड झाल्याचे घोषित केले

पुणे येथील महिलेच्या शरीरात धडधडले माजी सैनिकाचे ह्रदय
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 9:22 AM

पुणे : रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेला अन् नंतर ब्रेन डेड झालेल्या मध्य प्रदेशातील भिंड येथील माजी सैनिकाच्या ह्रदयाचे प्रत्यारोपण ( heart transplant) शनिवारी पुणे येथे करण्यात आले. त्यासाठी विशेष विमान ह्रदय आणले गेले होते. या विशेष विमानासाठी ग्रीन कॉरिडॉर (Green Corridor) तयार करण्यात आला होता.अन् अवघ्या पाच तासात ही प्रक्रिया करण्यात आली. मग शस्त्रक्रियेनंतर पुणे येथील महिलेच्या ह्रदयात माजी सैनिकाच्या ह्रदयाची धकडन सुरु झाली. पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेसमध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. ’एआयसीटीएस’ मध्ये दोन आठवड्यांत ह्रदय प्रत्यारोपणाची झालेली ही दुसरी शस्त्रक्रिया आहे.

असे आणले ह्रदय पुण्यात

हे सुद्धा वाचा

मध्य प्रदेशातील भिंड येथील माजी सैनिकाला रस्ते अपघात गंभीर दुखापत झाली. त्यांच्यांवर दिल्लीतील ’आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल’ सेंटरमध्ये उपचार सुरु होते. डॉक्टरांनी 11 फेब्रुवारी रोजी रुग्णाला ब्रेन डेड झाल्याचे घोषित केले. मग माजी सैनिकाच्या कुटुंबाने अवयवदान करण्यास सहमती दर्शवली.

पुणे येथील एका 29 वर्षीय महिलेचे ह्रदय कमकुवत झाले होते. तिच्या शरीरात दुसरे ह्रदय् प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नव्हता. हृदय अवयदात्याच्या शरीरातून काढल्यानंतर त्याचे प्रत्यारोपण चार ते पाच तासांत होणे आवश्यक असते. सैन्यदलाच्या यंत्रणेने आव्हान पेलत विशेष विमानाने माजी सैनिकाचे ह्रदय पुण्यात आणण्यात आले. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले होते.

शस्त्रक्रिया झाली यशस्वी

प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियेसाठी विशेष विमानाने दिल्लीवरुन हृदय पुणे येथील लोहगाव विमानतळावर आणले. ग्रीन कॉरिडॉरमुळे काही तासांत हृदय घेऊन दिल्लीतील टीम एआयसीटीएसमध्ये दाखल झाली. ’एआयसीटीएस’ मधील हृदयशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख व भुलतज्ज्ञांनी काही तासांमध्येच सैनिकाच्या पत्नीमध्ये हृदय प्रत्यारोपित केलं. अन् त्या 29 वर्षीय महिलेला पुन्हा नव्याने जीवदान मिळाले

सैनिकाच्या पत्नीला मिळाले ह्रदय

भारतीय सैन्यदलात सेवेत असलेल्या सैनिकाच्या 29 वर्षीय पत्नीचे हृदय कमकुवत झाले होते. तिच्या शरीरात दुसरे ह्रदय प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्या महिलेला ’डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ हा आजार होता. तिच्यावर सहा महिन्यांपासून हृदयाला शॉक देणारे एक विशेष इंप्लांट बसवण्यात आले होते. आता काही दिवसांत ती महिला सामान्य होणार आहे. तिच्या सर्व हालचालीसुद्धा सामान्य असणार आहे. यामुळे अवयदानाचे मोठे महत्व निर्माण झाले आहे. हे महत्व ओळखून देशात अवयदान करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.