Rain : दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार, कोणत्या भागांत कोसळणार मुसळधार

IMD Weather forecast : ऑगस्ट महिन्यात पाऊस नव्हता. यामुळे आता पावसाची सर्व अपेक्षा सप्टेंबर महिन्यावर आहे. यावेळी हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. राज्यात येत्या दोन, तीन दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे.

Rain : दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार, कोणत्या भागांत कोसळणार मुसळधार
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 2:24 PM

पुणे | 5 सप्टेंबर 2023 : देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. केवळ जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यात खरीप हंगाम घेतला गेला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पडलेल्या खंडामुळे खरीप हंगाम धोक्यात आला. सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे. आता पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी पावसासंदर्भात दिलासा देणारी बातमी दिली आहे. येत्या दोन, तीन दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाच्या मॉडेलच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रात येत्या दोन, तीन दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यात सहा आणि सात सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस होईल. विदर्भातील काही भाग, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागात चांगला पाऊस होणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे मान्सून वारे सक्रीय होणार आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात यामुळे आता चांगला पाऊस होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यात दुष्काळ

पुणे जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. राज्यातील 27 तालुक्‍यांमध्ये 1 जून ते 1 सप्टेंबरपर्यंत 25 ते 50 टक्के कमी पाऊस झालेला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर आणि हवेली या चार तालुक्‍यांमध्ये कमी पाऊस झाला आहे तर बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आदी तालुक्‍यांत अद्यापही पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. यामुळे या भागात दुष्काळसद्दश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र लिहिले आहे.

हे सुद्धा वाचा

सोलापूरमध्ये पाऊस, नाशिकमधील जलसाठा कमी

सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरासह परिसरातील गावात सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी आहे. सोलापूर जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून पावसाची प्रतिक्षा होती. नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये गेल्यावर्षी पेक्षा यंदा २५ टक्के कमी पाणीसाठा झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदाच्या वर्षी केवळ ५९ टक्के जलसाठा आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ८३ टक्के भरले आहे.

Non Stop LIVE Update
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.