Biparjoy Cyclone Video : बिपरजॉय चक्रीवादळ अवकाशातून कसे दिसले, पाहा व्हिडिओ

Biparjoy Cyclone Video : अरबी समुद्रात ६ जूनपासून सक्रीय झालेले बिपरजॉय चक्रीवादळाचा जोर आता ओसरला आहे. हे वादळ रविवारी शांत होणार आहे. हे चक्रीवादळ अवकाशातून कसे दिसले, याचा व्हिडिओ भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.

Biparjoy Cyclone Video : बिपरजॉय चक्रीवादळ अवकाशातून कसे दिसले, पाहा व्हिडिओ
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 12:29 PM

पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये गुरुवारी धडकले. त्यानंतर ते शुक्रवारी कमकुवत होत राजस्थानकडे गेले. या चक्रीवादळामुळे गुजरातमधील आठ जिल्ह्यातील एक लाखांपेक्षा जास्त लोकांचे स्थालांतर करण्यात आले होते. या चक्रीवादळा दरम्यान कच्छमधील जनतेने दाखवलेले धैर्य अन् प्रशासनाने केलेल्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतूक केले आहे. आयएमडीनेही हे वादळ अवकाशातून कसे दिसते, त्याचा व्हिडिओ जारी केला आहे.

मोदी यांनी केले कौतूक

मन की बात कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळ बिपरजॉयचा उल्लेख केला. ते म्हणाले की, दोन-तीन दिवसांपूर्वीच देशाच्या पश्चिम भागात किती मोठे चक्रीवादळ आले, ते आम्ही पाहिले… जोरदार वारे, मुसळधार पाऊस. गुजरातमधील कच्छच्या जनतेने दाखवून दिले आहे की त्यांच्या हिंमतीपुढे कोणीही टिकू शकत नाही. बिपरजॉय वादळाचा पराभव करण्यात या लोकांचे धैर्य कामी आले. या चक्रीवादळामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे परंतु कच्छच्या लोकांनी ज्या धैर्याने आणि सज्जतेने अशा धोकादायक चक्रीवादळाचा सामना केला. तसेच प्रशासनाने केलेल्या बचावकार्याचे मोदी यांनी कौतूक केले.

हे सुद्धा वाचा

वादळामुळे राजस्थानात पाऊस

६ जूनपासून धुमाकूळ माजवणारे बिपरजॉय चक्रीवादळ रविवारी अरबी समुद्रात शांत होणार आहे. परंतु त्यामुळे अजून तीन ते चार दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जयपूरमध्येही रविवारी सकाळपासून वातावरणात बदल झाला आहे. रविवारी रात्री जयपूरमध्येही त्याचा परिणाम दिसून येईल. इथे पावसाची शक्यता आहे. बिपरजॉयचा प्रभाव जयपूरमध्ये तीन ते चार राहणार आहे. येथील हवामानातील बदलामुळे तापमानात घट झाली आहे. जयपूरच्या हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येथेही तीन ते चार दिवसांत अनेक वेळा हवामान बदलेल. फक्त, इथे मुसळधार पावसाची शक्यता नाही ही दिलासादायक बाब आहे.

गुजरातमध्ये काय केल्या उपाययोजना

  • 13 जून रोजी मुख्यमंत्र्यांनी 6 जिल्ह्यांतील 65 लाख लोकांच्या मोबाईलवर अलर्ट मेसेज पाठवला होता.
  • गर्भवती महिलांची त्यांच्या प्रसूतीच्या तारखेनुसार यादी तयार करण्यात आली आणि 1,152 वैद्यकीय सेवा केंद्राकडे पाठवण्यात आली.
  • सिंह आणि वन्यप्राण्यांच्या बचावासाठी 210 पथके तैनात करण्यात आली होती.
  • गुजरातमध्ये 1 लाख 8 हजार लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले असून त्यात 11 हजार मुले आणि 5 हजार वृद्धांचा समावेश आहे.
  • तटरक्षक दलाने समुद्रात अडकलेल्या 50 लोकांना वाचवले असून त्यांना ओखा केंद्रात ठेवले आहे. 21 हजार बोटी किनाऱ्यावर थांबवण्यात आल्या आहेत.
  • एनडीआरएफच्या 19 तुकड्या, एसडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. मदतकार्यात गुंतलेल्या गुजरात पोलिस कर्मचाऱ्यांना सॅटेलाइट फोन देण्यात आले.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.