कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटला घाबरु नका, पण काळजी घ्या, डॉ. तात्याराव लहाने म्हणतात…
Maharashtra Corona Update | भारतात कोरोनाचा नवीन व्हॅरीयंट मिळाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोरोनाचा सबव्हॅरीयंट JN.1 ची पहिली केस केरळमध्ये मिळाली आहे. त्यानंतर देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यासंदर्भात डॉ. तात्याराव लहाने यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, पण काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सागर सुरवसे, सोलापूर, दि.21 डिसेंबर | कोरोनाचा नवीन व्हॅरीयंट JN.1 ची पहिली केस केरळमध्ये मागील आठवड्यात मिळाली आहे. त्यानंतर राज्यातील सिंधुदुर्गात ‘जेएन1’ चा एक रुग्ण आढळला आहे. भारतात आणि आता महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पुणे, मुंबई शहरात कोरोनाचे आढळून येत आहे. यानंतर केंद्रीय आरोग्य यंत्रणेने राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘टीव्ही ९ मराठी’ने ज्येष्ठ कोव्हिड तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी संवाद साधला. त्यांनी नव्या जेएन 1 व्हेरियंटने घाबरून जाण्याचे कारण नाही, पण काळजी घेण्याचे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपासून अमेरिका, चीन आणि सिंगापूर या देशांमध्ये ‘जेएन1’ या नव्या व्हेरियंट आहे. या देशांममध्ये या व्हेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहे.
काय म्हणतात डॉ.तात्याराव लहाने
कोरोनाचा ‘जेएन1’व्हेरियन्ट जगात ऑगस्ट महिन्यात सापडला आहे. मात्र मागील पाच महिन्यांत या व्हेरियंटमुळे फारसा धोका निर्माण केला नाही. त्यामुळे आताच घाबरून जाण्याचे कारण नाही. ओमीक्रॉननंतर जे व्हेरियंट आले त्यापासून फार धोका पाहायला मिळाला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने ‘जेएन1’ याला व्हेरियंट म्हणून घोषित केले आहे. परंतु हा सौम्य स्वरूपाचा व्हायरस आहे.
लक्षणे काय आणि काळजी कशी घ्यावी
- ताप येणे, नाक गळणे, जुलाब होतात. यापुढे फार काही होत नाही.
- ‘जेएन1’व्हेरियन्टमुळे फुप्फुसाला संसर्ग होण्याचा धोका नाही. मात्र पुढे तो काय स्वरूप प्राप्त करतो ते पाहावे लागेल.
- आता विमानतळावर मास्क लावणे गरजेचे झाले आहे. ज्या व्यक्तीची प्रतिकार क्षमता कमी असेल त्यांना काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच घश्याचा त्रास असेल तर काळजी घ्यावी.
नाशिकमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क
देशामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर नासिकमध्ये देखील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालय तसेच जाकीर हुसेन रुग्णालयात देखील अतिरिक्त बेड राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच इतर यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.