Pune crime : छळ केला, अंगावर चटकेही दिले; चारित्र्याचा संशय घेत नराधमानं केला पत्नीचा निर्घृण खून, पुण्याच्या घोडेगावात गुन्हा दाखल
आंबेगाव, पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नराधम पतीने पत्नीचा खून (Wife murder) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे. 27 वर्षीय पत्नीचा छळ करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. पीडित महिलेच्या आईच्या तक्रारीवरून घोडेगाव पोलिसांत (Ghodegaon Police) पत्नीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर […]
आंबेगाव, पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नराधम पतीने पत्नीचा खून (Wife murder) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे. 27 वर्षीय पत्नीचा छळ करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. पीडित महिलेच्या आईच्या तक्रारीवरून घोडेगाव पोलिसांत (Ghodegaon Police) पत्नीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मंगेश मुकणे असे खून करणाऱ्या नराधम पतीचे नाव आहे. मंगेश हा चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला नेहमीच त्रास देत असे. तिला मारहाण (Beaten) करीत असे. मारहाण करतानाही तो अत्यंत क्रूरपद्धतीने वागत असल्याचे समोर आले आहे. तिला वस्तू तापवून अंगावर चटके तो देत असल्याचे तपासात समोर आले आहे. हे सर्व चारित्र्याच्या संशयावरून होत होते. याप्रकरणी पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे.
अंगावर दिले चटके
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय मनात धरून पिंपळगाव घोडे (ता. आंबेगाव) येथे राधिका मंगेश मुकणे (वय 27) हिचा राहते घरी पती मंगेश राजू मुकणे (वय 30, रा. पिंपळगाव घोडे) याने खून केला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव घोडे येथे दि. 5 रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या पूर्वी राधिका मुकणे हिचा पती मंगेश मुकणे याने आपल्या पत्नीचे कोणाबरोबर तरी अनैतिक संबंध आहे असा संशय घेऊन तिला मारहाण केली. तिच्या अंगाला वस्तू तापवून अंगाला चटके दिले. महिलेच्या अंगावर समोरून व पाठमागील बाजूस ठिकठिकाणी काहीतरी तापवून त्याच्या सहाय्याने चटके दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
मारहाणच नाही तर छळही
पती मंगेश मुकणे याने पत्नीला मारहाणच नाहीतर तिचा छळही केला. कशाच्या तरी सह्याने मारून तिचा खून केला. याप्रकरणी राधिका मुकणे हिची आई मंदा रामदास वाघ (रा. मंदोशीगाव, ता. खेड) यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश डौले करीत आहेत.