पिंपरी- चिंचवडमध्ये गृहाप्रकल्पासाठी होतोय अवैध वाळू उपसा : गतवर्षात प्रशासनाने केल्या इतक्या कारवाया
या सगळ्याला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशन सक्रिय झाले असून पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले आहेत . पोलिसांनी आतापर्यंत इंद्रायणी नदीतून केल्या जाणाऱ्या वाळूच्या तस्करी करणाऱ्यावर कारवाई केली आहे.
पुणे – पुणे जिल्ह्याचे वेगानं वाढत असलेला विकास दुसरीकडे तितक्याच वेगाने भकास करताना दिसून येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या गृहप्रकल्पाच्या बांधकामासाठी वाळूची तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. यासाठी मिळेल तिथे , मिळेल त्या पद्धतीनेवाळूचा उपसा केला जात आहे. बेकायदेशीर रित्या उपसल्या जाणाऱ्या वाळू तस्करांवर पोलीस व वाहतूकविभाग कारवाई करतांना दिसून येत आहे. गट वर्षात प्रशासनाने अश्या 10 वाळूतस्करांवर कारवाया केल्या आहेत.
गृहप्रकल्पासाठी वाळूची , खडीची आवश्यकता अधिक
शहरात मोठया संख्येने गृहप्रकल्पाचे काम सुरु आहे. या बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणात वाळुचीही आवश्यकता आहे. गौण खनिजाचा अवैधरित्या उपसा करुन त्याची बेकायदेशीररित्या विक्री केली जात आहे. मात्र या सगळ्याला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशन सक्रिय झाले असून पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले आहेत . पोलिसांनी आतापर्यंत इंद्रायणी नदीतून केल्या जाणाऱ्या वाळूच्या तस्करी करणाऱ्यावर कारवाई केली आहे.
इतर जिल्ह्यातून होतोय वाळूचा पुरवठा
शहरातील विविध गृहप्रकळपांसाठी इतर जिल्ह्यातून बेकायदेशीररित्या वाळूचा पुरवठा केला जात असल्याचे दिसून आले आहे. या प्रकारे बेकायदेशीररीत्या विना परवाना वाळूची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी करवाई केली आहे.
गौण खाणीत वर्षभर केलेली कारवाई पोलीस ठाणे –
देहू रोड -3 ,
एमआयडीसी भोसरी -3 ,
आळंदी -1 ,
चिंचवड -1,
निगडी – 1,
दिघी -1,
तळेगाव एमआयएडीसी – 1
महसूल विभागाची नजर गौण खनिजाच्या होणाऱ्या अवैध उपशावर महसूल विभागावाची नजर आहे. त्याबाबत पिंपरी अप्पर तहसीलदार कार्यालयाकडून ग्रामसेवक, तलाठी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. नदी पात्रातून अवैध द वाळू उपसा होत असल्यास त्याच्यावर थेट कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मिलिंद नार्वेकरांनी अशी काय खेळी केली की, दरेकर, लाड चित झाले, मुंबै बँक सेना-राष्ट्रवादीची झाली?
Amazon Great Republic Day Sale 17 जानेवारीपासून लाईव्ह, या टॉप स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट