AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD prediction| यंदा उन्हाळा कसा असणार? एप्रिल महिन्यातही पाऊस आहे का?

भारतीय हवामान खात्याने आगामी तीन महिन्यातील हवामान कसे राहणार आहे? यंदाचा उन्हाळा कसा असणार आहे? एप्रिल महिन्यात पावसाची शक्यता आहे का? या सर्व बाबींवर माहिती दिलीय. एप्रिल महिन्यात पुन्हा अवकाळीचे संकट असल्याचे म्हटलेय.

IMD prediction| यंदा उन्हाळा कसा असणार? एप्रिल महिन्यातही पाऊस आहे का?
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 10:01 AM

पुणे : मार्च महिना अवकाळी पावसात गेला. राज्यात सर्वत्र पाऊस झाला. या पावसात शेतीचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे अजूनही सुरु आहे. आता आगामी तीन महिन्यातील हवामान कसे राहणार आहे? यंदाचा उन्हाळा कसा असणार आहे? एप्रिल महिन्यात पावसाची शक्यता आहे का? या सर्व बाबींवर भारतीय हवामान खात्याने माहिती दिलीय. भारतीय हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली. त्याचवेळी यासंदर्भातील ट्विट ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसालीकर यांनी केलेय.

यंदा तापमान वाढणार, टोप्या रुमाल बाहेर काढा

यंदा उन्हाळा कडक असणार आहे. यामुळे तुम्ही घरात ठेवलेल्या टोप्या, रुमाल बाहेर काढून ठेवा. यंदा कमाल तापमान सरासरी पेक्षा 4 ते 5 अंशांनी जास्त राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत महाराष्ट्रासह देशभरातील कमाल तापमान सरासरी पेक्षा 4 ते 5 अंशांनी जास्त राहणार आहे. प्रायद्वीपीय प्रदेश आणि पश्चिम-मध्य भारताचा भाग वगळता एप्रिल ते जून या कालावधीत देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे.

पाऊस कसा असणार

जून ते ऑगस्ट दरम्यान ला-नीना सकारत्मक आहे. यामुळे मान्सूनला अडथळा नाही.परंतु एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. देशात एप्रिलमध्ये ३९.२ मी.मी इतका पाऊस पडतो. एप्रिल महिन्यात दक्षिण भारत वगळता उर्वरित देशात सामान्य पाऊस पडेल.दक्षिण भारतात पाऊस सामान्य पेक्षा जास्त पाऊस राहील.

ला- नीनाचा प्रभाव

देशात पावसासाठी ला नीना ही स्थिती चांगली आहे. जून ते ऑगस्ट पर्यंत ला नीना सकारत्मक आहे. मात्र मान्सूनचा अंदाज इतक्या लवकर देणे कठीण असल्याचे डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. हा अंदाज आम्ही 15 एप्रिल रोजी जाहीर करणार आहोत.

मार्चमध्ये कुठे कुठे पाऊस

साधारणपणे मार्चमध्ये पाऊस होत नाही. मेच्या अखेरीस अवकाळी पाऊस पडतो.  पण यंदा मार्चमध्येच पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर-पश्चिमेकडील काही राज्यातही पाऊस झाला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीत पाऊस झाला. चंदीगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र आणि राजस्थानातही मोठा पाऊस झाला. या ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.

मार्चमध्ये काय बिघडलंय?

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मार्च महिन्यात पाऊस होत असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळेच उत्तर-पश्चिमेकडे पाऊस होत आहे. या महिन्यात आतापर्यंत चार वेस्टर्न डिस्टर्बन्सने उत्तर पश्चिम भरातातील मैदानी परिसरांना प्रभावित केलं आहे. हा अवकाळी पाऊस शेतीसाठीही फायदेशीर नाही आणि आरोग्यासाठीही नाही.

हे ही वाचा

पुणे भाजपला धक्के, तीन महिन्यांतच तीन मोठे नेते गमावले, ही पोकळी कशी भरणार?

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.