पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नागरिकांकडून पिंजरा लावण्याची होतेय मागणी

या भागातलया ऊस शेतीमध्ये बिबट्याचे वास्तव्य अधिक आहे.साहजिकच त्याच परिसरात त्याचा वावर वाढला आहे. बिबट्या तालुक्यातील बोरी , मंगरूळ, साकोरी, निमगाव सावा, बेल्हे आदी उसाचे क्षेत्र भरपूर आहे. उसाचं पीक दाट असल्याने तसेच गारवा असल्याने बिबट्याचा वावर या भागात वाढत आहे.

पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण,  नागरिकांकडून पिंजरा लावण्याची होतेय मागणी
Leopard
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 4:05 PM

पुणे- जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला आहे. जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, आळेफाटा, मंचर याठिकाणी सातत्याने बिबटे दिसून येण्याबरोबरच बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनाही वाढल्या आहेत . आंबेगाव येथील शिंगवे येथे डिझेल आणायला निघालेल्या तानाजी प्रभाकर झांबरे या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे मंचर येथे बिबट्याने चक्क सश्यावर झडप घातली आहे.  कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच समोर आली आहे. बिबट्याच्या या वाढत्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही शेतातून परत येत असताना पती- पत्नीवर बिबट्याने हल्ला केला. मात्र आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावण्यात दाम्पत्याला यश आले. मात्र या घटनेत पत्नीच्या पायाला गंभीर जखम झाली होती.

बिबट्याच्या अधिवासाठी पोषक ठरतोय हा भाग जिल्ह्यातील आंबेगाव ,जुन्नर, शिरूर , आळेफाटा हा भाग हरित पट्टा म्हणून ओळखला जातो. दुसरीकडं मागील काही वर्षांपासून बिबट्याच्या उत्पत्ती वाढण्यास हा भाग पूरकपोषक ठरत आहे. या भागातलया ऊस शेतीमध्ये बिबट्याचे वास्तव्य अधिक आहे.साहजिकच त्याच परिसरात त्याचा वावर वाढला आहे. बिबट्या तालुक्यातील बोरी , मंगरूळ, साकोरी, निमगाव सावा, बेल्हे आदी उसाचे क्षेत्र भरपूर आहे. उसाचं पीक दाट असल्याने तसेच गारवा असल्याने बिबट्याचा वावर या भागात वाढत आहे. यामुळे रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.

वनविभागाचा धीमा कारभार

जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढत असताना दुसरीकडे विभागाचा कारभार मात्र सरकारी गतीने चालेला पाहायला मिळत आहे. अनेक परिसरात नागरिकांनी बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती दिली आहे. तसेच पिनजर लावण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र वनविभागाकडून याची तात्काळ दखाल घेतली जात नाही. अनेकदा या मागण्याना वन विभागाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

VIDEO | कॉफी शॉपमध्ये गुप्त जागा, अश्लील चाळे करताना प्रेमी युगुलं रंगेहाथ

खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण, पती सदानंद सुळेंचा अहवालही पॉझिटिव्ह, ट्विटरवरून दिली माहिती

नारायण राणेंच्या बंगल्यावर पोलिसांची नोटीस, दहाच मिनिटात राणेंच्या कर्मचाऱ्याने नोटीस काढली?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.