AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : गहुंजे परिसरातील वाहतुकीत बदल, मॅचसाठी पुण्या-मुंबईहून येणाऱ्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाची बातमी

IND vs ENG : भारत आणि इंग्लंडमध्ये चौथा T20 सामना पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर होणार आहे. या मॅचसाठी पुण्या-मुंबईहून येणाऱ्या क्रिकेट चाहत्यांसाठी वाहतूक व्यवस्था कशी असेल? ते स्टेडियमपर्यंत कुठल्या मार्गाने पोहोचू शकतात, त्यासाठी एकदा ही बातमी वाचा.

IND vs ENG : गहुंजे परिसरातील वाहतुकीत बदल, मॅचसाठी पुण्या-मुंबईहून येणाऱ्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाची बातमी
india vs england t20i seriesImage Credit source: bcci
Follow us
| Updated on: Jan 30, 2025 | 10:02 AM

भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये चौथा T20 सामना शुक्रवारी 31 जानेवारी रोजी होणार आहे. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. सध्या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. या क्रिकेट सामन्यासाठी गहुंजे परिसरातील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. ज्या वाहनधारकांकडे (व्ही. व्ही.आय.पी/व्ही.आय.पी/इतर अत्यावश्यक सेवा) वाहनाचा पास असेल अशा वाहनांना स्टेडियमकडे जाताना द्रुतगती महामार्गाच्या उजव्या बाजूच्या सेवा मार्गाचा पर्याय देण्यात येणार आहे.

मुंबईकडून येणा-या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी मार्ग खालील प्रमाणे

द्रुतगती मार्गाचे देहूरोड एक्झिट मधून डावीकडे वळावे त्यानंतर तात्काळ परत डावीकडे वळून एक्सप्रेस हायवे लगतच्या मामुर्डीगावाचे बाजुस असलेल्या सर्विस रोडने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.

द्रुतगती मार्गावरुन येणारी वाहने किवळे ब्रिज वरून मुकाई चौक येथुन यु टर्न घेऊन कृष्णा चौक मार्ग एक्सप्रेस लगतच्या सिम्बॉयसेस कॉलेजच्या बाजुकडील असलेल्या सर्विस रोडने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.

शितलादेवी मंदीर येथुन डाव्या बाजूस वळवून लेखा फार्म मार्गे असलेल्या सर्विस रोडने स्टेडीयमकडे व पाकिंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.

सेंट्रल चौक मार्गे मुकाई चौकात येणारी वाहने किवळे ब्रिज खालून कृष्णा हॉटेल शेजारुन मामुर्डी अंडर-पासचे डाव्या बाजूने अथवा एमएच ०४ बोगद्यातून डावीकडे वळून कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंगकडे जातील. जुन्या मुंबई-पुणे हायवेने येणारी वाहने सेंट्रल चौक येथून यु टर्न घेवून साई नगर फाटा मार्गे पार्किंग ठिकाणी जातील.

मनाई – जुना मुंबई पुणे हायवेने येणारी वाहने सोमाटणे फाटा, सेंट्रल चौक मार्गे बेंगलोर हायवे वरील मामुर्डी जकातनाका जवळील अंडरपास व रस्त्याने येणारे प्रेक्षकाच्या वाहनांना शितलादेवी मंदीर येथून मामुर्डी गावात येण्यास बंदी करण्यात येत आहे

पुणे बाजुकडून येणा-या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी मार्ग खालील प्रमाणे

पुणे बंगलोर महामार्गावरुन पवनानदी ब्रिज, हॉटेल सॅन्टोंसा पास करुन किवळे ब्रिज वरुन वाहने डाव्या बाजुकडे वळवावी व 200 मीटर वरुन द्रुतगती मार्गाचे डाव्या बाजुने असलेल्या सर्विस रोडने स्टेडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करतील.

निगडी, हँगिंग ब्रिज कडून येणारे प्रेक्षकांची वाहने रावेत चौक, भोंडवे चौक, मुकाई चौक मार्ग कृष्णा चौक येथुन उजव्या बाजुस वळुन परत एक्सप्रेस हायवे पासून डाव्या बाजुस वळुन असलेल्या सर्विस रोडने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करतील.

गहुंजे पुल ते वाय जंक्शन मार्गे स्टेडियमकडे फक्त कार पासधारक वाहनांना तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश देण्यात येईल.

मामुर्डी गावातील रूहिड़ा बिर्यानी ते मासुळकर फार्म बाजुकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी. या मार्गावरील वाहने मामुर्डी जकातनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

मरीमाता चौक किवळे नाला येथुन मासुळकर फार्म बाजुकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने कृष्णा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

सामना संपल्यानंतर मुकाई चौक बसस्टॉपकडून किवळे अंडरपासमार्गे मुंबई तसेच किवळे बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनास वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येईल. या मार्गावरील वाहने मुकाई चौक येथून डावीकडे वळून समीर लॉन्स किवळे गाव मार्गे इच्छित स्थळी जातील.

मामुर्डी ते कानेटकर बंगला तसेच मामुर्डी ते गहुंजे स्टेडीयम कडे जाण्या-येण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना ३१ जानेवारी रोजी दुपारी तीन ते रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येत आहे.

कृष्णा चौक ते मामुर्डी अंडरपास मार्गे तसेच जुन्या पुणे मुंबई महामार्गाचे शेजारील मामुर्डी गावचे बाजुस असलेल्या सर्विस रोडने गहुंजे स्टेडीयम कडे जाण्या-येण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना ३१ जानेवारी रोजी दुपारी तीन ते रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येत आहे.

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.