काळाचा घाला! इंदापूरच्या कबड्डीपटूंच्या गाडीचा अपघात, 2 गुणी कबड्डीपटू ठार
इंदापूर तालुक्यातील कळंब गावच्या दोन कबड्डी खेळाडूंचा विजापूर जवळच्या बेडगमध्ये अपघातात मृत्यू झाला आहे. (Indapur Kabaddi Player Accident in Karnataka)
पुणे: इंदापूर तालुक्यातील कळंब येथील महाराणा कबड्डी संघातील खेळाडू विजापूर येथे कबड्डी स्पर्धेत खेळण्यासाठी गेले असता त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या घटनेमध्ये 2 जण ठार झाले असून 2 जण गंभीर आहेत. आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास तवेरा गाडीला अपघात झाला असून त्यामध्ये २ कबड्डीपट्टू यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती समजली आहे. गंभीर सर्व खेळाडूंना विजापूर येथील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या अपघाताची दखल घेतली आहे. या खेळाडूंच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. (Indapur Kabaddi players tavera car accident near Vijapur Bedag two died two injured)
विजापूरच्या बेडगडजवळ अपघात
कर्नाटकातील विजापूर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बेडग येथे आज कबड्डीचे राष्ट्रीय राज्यस्तरीय सामने खेळले जाणार होते, या सामन्यांसाठी इंदापूर तालुक्यातील कळम व वालचंदनगर, भवानीनगर व आसपासच्या कबड्डी खेळाडूंचा समावेश असलेला महाराणा संघ सहभागी होणार होता, यासाठी आज पहाटे लवकरच हे सर्व कबड्डीपटू निघाले होते, मात्र विजापूरच्या पुढे काही अंतरावर ती त्यांच्या गाडीचा व ट्रकचा भीषण अपघात होऊन दोन कबड्डीपटू यांचा जागीच मृत्यू झाला असून यातील जखमींना विजापूर येथील बंजारा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे…
ग्रामस्थ विजापूरला रवाना
सोहेल सय्यद (वय २२) व महादेव आवटे (वय २०) अशी मृत झालेल्या या कबड्डीपट्टुंची नावे असल्याचे समजते. तर दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. महाराणा कबड्डी संघ राज्यात प्रसिध्द आहे. या संघात अनेक राष्ट्रीय कबड्डीपट्टू घडले आहेत.अनेकजण कबड्डीच्या बळावर पोलीस भरती देखील झाले आहेत. आज झालेल्या अपघाताची माहिती समजल्यानंतर परीसरात हळहळ व्यक्त होत असून कळंबमधुन तातडीने ग्रामस्थ विजापुरच्या दिशेने रवाना झाले आहेत…
सुप्रिया सुळे यांचे ट्विट
इंदापूर तालुक्यातील कळंब येथील महाराणा कबड्डी संघाच्या गाडीला विजापूर येथे अपघात होऊन सोहेल सय्यद व महादेव आवटे या दोन गुणी कबड्डीपटूंचा मृत्यू झाला.तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना दुःखद आहे. या खेळाडूंच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
— Supriya Sule (@supriya_sule) March 17, 2021
संबंधित बातम्या:
डोळ्यांदेखत पाहिला पत्नीचा मृत्यू, भरधाव पिकअपने जोडप्याला 7 फुटांपर्यंत फरफटत नेलं अन्.
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, वाशी टोल नाक्याजवळची घटना
(Indapur Kabaddi players accident near Vijapur Bedag two died two injured)