इंदापूर नगरपरिषेद म्हणते, मै झुकेगा नहीं ; लेकिन कचरा दिखेगा तो झुकेगा भी और…; ‘या’ स्तुत्य उपक्रमासाठी नगरपरिषदेने लढविले नामी शक्कल
इंदापूर नगरपरिषदेच्या भिंतीवर असलेला पुष्पाभाई मात्र में झुकेगा नही लेकिन कचरा दिखेगा तो झुकेगा भी और डस्टबिन में डालेगा भी साला म्हणताना दिसत आहे. यामुळे इंदापूर नगरपरिषदेने लढवलेली ही नामी शक्कल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
इंदापूरः पुष्पा चित्रपटातील में झुकेगा नही साला हा डायलॉग प्रसिद्ध झाला आणि प्रत्येकाच्या तोंडी तो संवाद रुळलाही. हातवारे करीत मैं झुकेगा नाही साला असे रस्ता रस्त्यावरती अनेक जण आपणाला दिसत होते. मात्र इंदापूर नगरपरिषदेच्या (Indapur Municipal ) भिंतीवर असलेला पुष्पाभाई मात्र में झुकेगा नही लेकिन कचरा दिखेगा तो झुकेगा भी और डस्टबिन में डालेगा भी साला म्हणताना दिसत आहे. इंदापूर नगरपरिषदेने लढवलेली ही नामी शक्कल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये पुष्पा (Pushpa) सिनेमातील हा डायलॉग अनेक जण म्हणत असले तरी त्या पाठीमागची अनेकांची भावना मात्र इंदापूरच्या स्वच्छतेसाठी झटत आहे.
इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण (clean survey) मोहिमेत अंतर्गत देशपातळीवर सलग तीन ते चार वर्ष पारितोषिके मिळवली आहेत. त्यामुळे स्वच्छतेबाबत इंदापूर नगरपरिषदेना आता एक नवा आदर्श घालून दिला आहे. स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत आता इंदापूरमध्ये हा नाविन्यपूर्ण उपक्रम स्वच्छतेसाठी नवा प्रयोग ठरणा आहे. स्वच्छतेमध्ये आपल्या शहराचे नाव देशपातळीवर उंचावण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे.
जनजागृतीसाठी वेगळा उपक्रम
शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी या कारणास्तव शहरात विविध ठिकाणी बोलकी चित्रे रेखाटण्यात आली असून हे पुष्पा चे चित्र मात्र शहरात चर्चेचा विषय बनले आहे. “में झुकेगा नहीं लेकीन कचरा दिखेगा तो झुकेगा और डस्टबीन में डालेंगा भी साला” या डायलॉगने आता इंदापूरमध्ये लक्षवेधून घेतल तर आहेच पण यामुळे शहरातील स्वच्छतेलाही हातभार लागणार आहे. त्यामुळे आता इंदापूरमध्ये या डायलॉगची आता वेगळी झलक पाहायला मिळत आहे.
इंदापूरमधील बोलक्या भिंती
स्वच्छ सर्वेक्षण मोहिमे अंतर्गत इंदापूर नगरपरिषदेने या आधीही आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे आता शहरातील भिंती झुकेगा नहीं या चित्राच्या माध्यमातून रंगवल्या गेल्या असल्याने स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी याचा फायदा होणार आहे. पुष्पा चित्रपटातील या संवादामुळे आता इंदापूरमधील भिंतीही आता बोलक्या झाल्या आहेत.
संबंधित बातम्या
पिंपरीतील सराईत गुंडावर मोक्का, गणेश गायकवाडच्या टोळीवर कारवाई
VIDEO | उठाले रे बाबा! नो पार्किंगमधील स्कूटर सामानासकट उचलली, स्थळ आपलं नेहमीचंच-पुणे!
आरटीओने जप्त केलेल्या 18 वाहनांचा ई-लिलाव, दहा दिवस वाहन पाहणीचा कालावधी; 23 मार्चला लिलाव