Rain : राज्यात मान्सून कमजोर, IMD ने दिला नाही कुठेही अलर्ट, केव्हापासून होणार पाऊस सक्रीय

IMD Weather forecast : राज्यात जुलै महिन्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. परंतु ऑगस्ट महिन्यात मान्सून कमकुवत राहिला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात मुसळधार बरसलाच नाही.

Rain : राज्यात मान्सून कमजोर, IMD ने दिला नाही कुठेही अलर्ट, केव्हापासून होणार पाऊस सक्रीय
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 10:20 AM

पुणे | 8 ऑगस्ट 2023 : राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यंदा उशीरा दाखल झालेला मान्सून जुलै महिन्यात सर्वत्र झाला. कोकण आणि विदर्भात तर अतिवृष्टी झाली. अनेक गावांना पाण्याने वेढले होते. यामुळे हाहाकार माजला होता. एनडीआरएफची टीम तैनात केली होती. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कमी होऊ लागला. अजून काही दिवस पावसाचा जोर कमकुवत असणार आहे. राज्यात मंगळवारी कोणत्याही जिल्ह्यास अलर्ट दिला गेला नाही.

पावसाचा ब्रेक शेतकरी चिंतेत

राज्यात पावसाने ब्रेक घेतल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. यंदा हवामान विभागाने एल निनोचा प्रभाव असल्याचे म्हटले होते. यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज स्कायमेटकडून व्यक्त केला गेला होता. परंतु भारतीय हवामान विभागाने सरासरी इतका पाऊस असणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे दुष्काळाचे संकेत तर नाहीत ना? अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी राज्यात 10 ऑगस्टपर्यंत कुठेच मुसळधार पाऊस नसल्याचे म्हटले आहे.

कधी पडणार पाऊस

हवामान विभागाच्या माहितीनुसार तीन दिवसानंतर हिमालयाच्या पायथ्याशी पाऊस सुरु होणार आहे. बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. तीन दिवसानंतर कोकणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. राज्यात 15 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने तेरा हजार पाचशे हेक्टरवर इंद्रायणी भाताच्या शेतीची लागवडी करण्यात आली आहे. यंदा जवळपास 92 टक्के शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली आहे.

धरणांमध्ये जलसाठा

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण आतापर्यंत ८७ टक्के भरल्याने नाशिककरांची पाण्याची चिंता दूर झालीय. परंतु नाशिकमधील पावसाचे इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदाघाट परिसरात असलेल्या दुतोंड्या मारुतीला यंदा पाण्याचा स्पर्श झालेला नाही. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत चार वेळेस महापूर गोदावरीला आला होता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.